Breaking News

राजकारण

कोरेगांव भिमा एल्गार परिषदेत पेशवाईचा उल्लेख केला म्हणून गुन्हा दाखल कबीर कलामंच आणि सुधीर ढवळेंवर पुन्हा गुन्हा

पुणे : प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकिय, सामाजिक पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मात्र कोरेगाव भिमा येथील दंगलीचे सुत्रधार असलेल्यांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्याऐवजी दलित समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आपल्या भाषणात पेशवाईला गाडा असे सांगितल्याने रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे आणि कबीर कलामंचच्या …

Read More »

कमला मिल आगप्रकरणी काँग्रेस भाजपकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काँग्रेसच्या निरूपम यांच्या आरोपाला भाजपच्या भांडारींचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळमधील कमला मिल कंपाऊडमधील मोजो ब्रिस्टो आगप्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी हॉटेल मालकांसोबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. त्यास प्रतित्तुर देत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी काँग्रेस काळातील नियमबाह्य परवाग्यांचे पितळ उघड होवू नये यासाठीच प्रशासनावर …

Read More »

भिमा कोरेगाव प्रकरणाची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश आहे. याप्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत असतानाही हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळण्यात अपयश आल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दादर येथील …

Read More »

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली मुख्यमंत्री केजरीवाल येणार असल्याने परवानगी नाकारल्याची ब्रिगेडीयर सावंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी २०१८ रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार असल्याने बुलढाणा पोलिसांनी या कार्यक्रमालाच परवानगी नाकारल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत …

Read More »

महाराष्ट्र बंद प्रकरणी ५ हजार दलित कार्यकर्त्यांना अटक कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी संघटनांची धावाधाव

मुंबईः प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे उसळलेल्या दंगलीच्या निशेधार्थ दलित संघटना आणि डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या कालावधीत जवळपास राज्यभरातील पाच हजार दलित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र बंदच्या कालावधीत काही ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. त्या …

Read More »

कोरेगाव भिमा घटनेच्या चौकशीसाठी न्यायमुर्तीची नेमणूक लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रभारी न्या. विजया ताहिलरमाणींची भेट

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील दलितांवरील दगडफेकीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीची नेणूक करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशाची नियुक्ती करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामणींची भेट घेत त्यासंदर्भात विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार लवकरच …

Read More »

कोरेगाव भिमा येथील घटनेमागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ शिव प्रतिष्ठानचा आरोप; भिडेंचा कार्यक्रम अखेर पोलिसांकडून रद्द

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या मागे संभाजी भिडे यांचा हात नसून त्या मागे संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ या संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. तसेच १ जानेवारी रोजी भिडे हे कोरेगाव भिमा येथे नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी संबध असणे शक्यच नसल्याचा दावा शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या मुंबई विभागाचे कार्यवाह …

Read More »

आपची संभाजी भिडेंच्या अटकेसाठी ऑनलाईन पिटीशन प्रीती शर्मा मेनन यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरेगाव भिमा येथे अभिवादन करण्यासाठी जमलेल्या दलित समाजाच्या विरोधात हल्ला करण्यासाठी उद्युक्त केल्याप्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे भिडे यांना अटक करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने ऑनलाईन पिटीशन दाखल करण्यात येणार असून या पिटीशनवर जास्तीत जास्त लोकांनी सह्या कराव्या असे आवाहन …

Read More »

हसमुख चेहऱ्याचे राजकारणातील वसंत डावखरे मित्र गेले सर्व पक्षिय नेत्यांकडून शोक व्यक्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांचे मित्र तथा राजकारणातील चमत्काराची किमया दाखविणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे काल रात्री गुरूवारी निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ठाण्यातील हरी निवास येथील …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणी मुंबईत दलित समाजाकडून शांततेत रास्ता रोको उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद

मुंबईः प्रतिनिधी दलित समाजावर भीमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मुंबईतील विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने करत शांततेत बंद पार पाडला. काही ठिकाणी तुरळक वाहनांवर दगडफेकीच्या घटनांचा अपवाद वगळता मुंबईतील बहुतांष भागात बंद शांततेत पार पडला. सकाळीच दलित समाजाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने रस्त्यांवर येत दुकाने बंद करण्याचे …

Read More »