Breaking News

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी नाकारली मुख्यमंत्री केजरीवाल येणार असल्याने परवानगी नाकारल्याची ब्रिगेडीयर सावंत यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी २०१८ रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार असल्याने बुलढाणा पोलिसांनी या कार्यक्रमालाच परवानगी नाकारल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.

कोरेगाव भिमा येथील दंगलीचे पडसाद राज्यात उमटल्यानंतर मुंबईतील छात्र भारतीच्या कार्यक्रमाला गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने हे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जिजाऊ या राष्ट्रमाता असून त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रमाता जिजाऊंनी ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविलं. त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचा उपद्व्याप समजून न येणारा आहे. जिजाऊंच्या जंयती कार्यक्रमातून कायदा व सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण होणार होता असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *