Breaking News

कोरेगाव भिमा घटनेच्या चौकशीसाठी न्यायमुर्तीची नेमणूक लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रभारी न्या. विजया ताहिलरमाणींची भेट

मुंबईः प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील दलितांवरील दगडफेकीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीची नेणूक करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानुसार या घटनेच्या चौकशीसाठी न्यायाधीशाची नियुक्ती करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामणींची भेट घेत त्यासंदर्भात विनंती केली.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीनुसार लवकरच उच्च न्यायालयाकडून प्रक्रिया पूर्ण करून न्यायाधीशाची नेमणूक करण्यात येईल.

कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे सामाजित पडसाद उमटले. तसेच दलित संघटना आणि डाव्या पक्षांकडून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या कालावधीतही काही ठिकाणी हिंसक घडना घडल्या. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या दोन्ही घटनांनंतर सामाजिक आणि राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले.

त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढल्याने अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोरेगाव भिमा येथील दंगलीची स्वतंत्ररित्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्याचे आणि या दंगलीत मृत्यूमुखी पावलेल्या दोन व्यक्तींच्या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानुसार या प्रक्रियेला आता सुरुवात झाल्याने लवकरच न्यायमुर्ती मार्फत चौकशी सुरु होवून लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *