Breaking News

राजकारण

सरकार विरोधातील मराठा क्रांती मोर्चाला फायनान्स करणारे कोण? आम्हाला माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर अप्रत्यक्ष आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा काढणाऱ्यांना फायनान्स करणारे कोण ? तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषदांची बीले अदा करणारे कोण आहेत? याची माहिती सरकारकडे इंटेलिजन्स असल्याने सर्व माहिती मिळते असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगत केवळ सरकारच्या विरोधात मराठा समाजाला उचकाविण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक नवनव्या गोष्टी …

Read More »

राज्याच्या राजकारणात भाजपचे गरज सरो वैद्य मरो निस्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या चिंतामण वनगांचा वारसदार पैसेवाला ठरणार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आतापर्यंत विद्यमान आमदार, खासदार किंवा कोणताही लोकप्रतिनिधीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या लोकप्रतिनिधीने केलेल्या कामाची पावती अथवा त्याने केलेल्या कष्टाला पोहोच म्हणून त्या व्यक्तीच्या घरातील कोणाही एकाला राजकिय वारसदार म्हणून त्या राजकिय पक्षाकडून जाहीर केले जाते. परंतु भाजपने त्यांच्या पक्षाचे निष्पृह आणि स्वच्छ चारित्र्याच्या व …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहकार संस्थांमुळेच दुधाला हमीभाव मिळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुधाला हमीभाव नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी  फुकट दूध  देण्याचे आंदोलन सुरु केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण ही होत आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचबरोबर या दोन पक्षांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार संस्थांमुळेच हा वाढीव दर मिळत नसल्यानेच …

Read More »

काँग्रेसला अखेर तीन जागा दिल्यानंतरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी विधान परिषदेसाठी आघाडी झाल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसने मागणी केल्याप्रमाणे तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने देत लातूर आणि परभणीच्या एका जागेची अदलाबदल करत नाशिक, सिंधुदुर्ग आणि वर्धा, अमरावती जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या जागेसाठी आघाडी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. बँलार्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन नव्हेतर ऑफलाईन स्कॉलरशिप मिळणार शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर …

Read More »

सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण मोदींना सौदी अरेबियात जाऊन कोकणचा सौदा केला: मोहन प्रकाश

नाणार : प्रतिनिधी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाची सर्वशक्तीनिशी साथ असून सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन …

Read More »

संभाजी भिडेच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न राहुरी तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश दिपक पवार

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील दलित समुदायाच्या विरोधात दंगल घडविल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीसाठी एका दलित कार्यकर्त्याने बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर दलित कार्यकर्ता हा रिपब्लिक सेनेचा कार्यकर्ता असून गणेश दिपक पवार असे नाव असल्याचे समजते. संपूर्ण …

Read More »

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, बेराजगारांना नोकऱ्या आणि बेघरांना घरे देणार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी निर्णयांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून पुर्नउच्चार

मुंबई : प्रतिनिधी कर्जमाफीपासून वंचीत राहिलेल्या जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढीलवर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी १२ लाख घरे बांधण्याचा मनोदय तसेच पुढील पाच वर्षात एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाचा पुनरूच्चार करीत …

Read More »

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर …

Read More »

डिजीटल ७/१२ देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागात ७/१२ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पदोपदी याची आवश्यकता भासत असते. प्रत्येक गोष्टीसाठी सातबारा लागतो. गावामध्ये सातबारा मिळणे आणि तोही फेरफार करून मिळणे हे दिव्य असायचे. पण आता डिजिटल स्वरुपातील व स्वाक्षरी असलेला ७/१२ मिळणार असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सध्या ४० हजार गावातील …

Read More »