Breaking News

भीमा कोरेगांवप्रकरणी मुंबईत दलित समाजाकडून शांततेत रास्ता रोको उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद

मुंबईः प्रतिनिधी

दलित समाजावर भीमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मुंबईतील विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आणि निदर्शने करत शांततेत बंद पार पाडला. काही ठिकाणी तुरळक वाहनांवर दगडफेकीच्या घटनांचा अपवाद वगळता मुंबईतील बहुतांष भागात बंद शांततेत पार पडला.

सकाळीच दलित समाजाचे कार्यकर्त्ये मोठ्या संख्यने रस्त्यांवर येत दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. तसेच चौका चौकात रास्ता रोको आंदोलन करत होते. त्यामुळे सायन ते पनवेल असलेला संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या.

विशेषतः बहुसंख्येने दलित समाज असलेल्या चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, विक्रोळी या परिसरातील कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला होता. अनेक कार्यकर्त्ये घोषणाबाजी करत भीमा कोरेगांव येथे दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली. त्यामुळे आंदोलकांना आंदोलन मागे घ्यावे म्हणून पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. दलित समाजाची तीव्र भावना लक्षात घेवून अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र त्यानेही आंदोलकांचे समाधान न झाल्याने आंदोलन तसेच सुरु ठेवले. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही काही कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केल्याने या मार्गावरील सेवा काही काळ ठप्प झाली होती. अखेर संध्याकाळी मुंबईतून उपनगराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होवू नये या उद्देशाने दलित संघटनांनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत भीमा कोरेगांव येथील दगडफेकी प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे आणि घुगे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी महाराष्ट्र बंद पुकारला. तसेच कोणत्याही अपवांना बळी न पडता दलित समाजाने शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तसेच सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीही दलित समाजाने कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन करत समाजाने शांतता राखावी असे आवाहन केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *