Breaking News

फडणवीसांचा सल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजभवनाच्या हिरवळीवर रोज जावून बसावे मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्यावर दिला सल्ला

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवानातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजकिय हवा कशीही असू दे मात्र राजभवनातील हवा फार थंड असते असे वक्तव्य केले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सल्ला देत, मुख्यमंत्र्यांनी रोज राजभवनाच्या हिरवळीवर जावून बसावे जेणेकरून त्यांचे चित्त शांत राहील आणि राज्यातल्या जनतेसाठी चांगले निर्णय घेता येतील.

देवेंद्र फडणवीस हे एका खाजगी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली.

राज्यात पुन्हा युती होणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. त्यावेळीच स्पष्ट झाले की, सत्तेसाठी शिवसेना कोणासोबतही जावू शकते.

राज्याच्या हिताच्यादृष्टीने त्यांना लवकर सुबुध्दी मिळो आणि त्यांनी चांगले निर्णय घ्यावेत अशी आशा मी व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

मागील १० वर्षे भाजपाने गोव्यात सत्ता राबविली आहे. या १० वर्षात भाजपाने येथील जनतेसाठी अनेक कामे केलेली आहेत. त्यामुळे कोणी कितीही येवून भाजपाच्या विरोधात अपप्रचार केला तरी भाजपाच पूर्ण बहुमताने सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाने दूर केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, उत्पल यांना भाजपाने नाही तर त्यांनी भाजपाला दूर केले आहे. भाजपा हा परिवार असून परिवार कधीही कोणाला दूर करत नाही. उत्पल यांना आम्ही त्यांना तीन जागांचा पर्याय दिला होता. त्यातील एक जागा तर हमखास निवडूण येणारी जागा होती. परंतु त्यांनी त्या सर्व जागा नाकारत स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पल पर्रिकर हे परत आले तर त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार का? असे विचारले असता पणजीच्या जागेवर भाजपाचा उमेदवार प्रचंड मताधिक्काने निवडूण येणार असल्याचे त्यांनी विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *