Breaking News

संसद सुरक्षेच्या मुद्यावरून निलंबित खासदारांचे आंदोलन सुरुच

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद न देता निवेदन अद्याप केले नाही. उलट विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज चालविले जात आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दोन्ही सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लोकशाही वाचवा अशी मागणी करणाऱे फलक फडकावित आणि केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आजही आंदोलन सुरुच ठेवले.

त्यातच राज्यसभा ही घटनात्मक संस्था आणि लोकशाहीचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट असतानाही देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मात्र तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार कल्याण बँनर्जी यांनी केलेली मिमिक्री आणि राहुल गांधी यांनी ती घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याच्या मुद्यावरून माफी मागण्याची मागणी केली. तसेच देशातील जाट समाजाचा अपमान आणि घटनात्मक पदाची प्रतिमा खालविल्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

त्यातच राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी बाकावरील बहुतांष खासदारांना निलंबित केल्यानंतरही या दोन्ही सभागृहाचे कामकाज निर्धोकपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच ज्या इंग्रज काळात देशातील गुन्हेगारी रोखण्याच्या अनुषगांने जे कायदे केले ते हटवून अमित शाह यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केलेले न्यायसंहिता नावाची तीन विधेयके विरोधकांच्या गैरहजेरीत लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमताच्या आधारे मंजूर करण्यात आले.

आजही विरोधक संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या या वर्तणूकीच्या विरोधात घोषणाबाजी करत लोकशाही वाचवा म्हणून आंदोलन केले. या विरोधकांच्या आंदोलनात निलंबित करण्यात आलेले सर्व खासदार सहभागी झाले होते.

Check Also

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स मॅनेज करता येऊ शकते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *