Breaking News

शरद पवार म्हणाले, काही समस्या असतील तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाहकडे नेईन शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनावेळी पवारांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम  

गुजरातच्या हातात देशाचे पंतप्रधान पद आणि सहकार मंत्रिपद आहे. परंतु महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबाबत विशेषत: पतपेढीसंदर्भात काही समस्या असतील तर मी तुम्हाला पंतपर्धान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे घेवून जाईन असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दिले.

नवी मुंबईत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिझर्व्ह बँकेचा सहकारी संस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन चमत्कारिक झाला आहे. गेल्या काही दिवसात त्यांचे सहकार क्षेत्राला सहकार्य मिळत नाही. रिझर्व्ह बँकेने सहकाराबाबत घेतलेले निर्णय चिंताजनक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच यातून नक्की मार्ग निघेल, चिंता करू नका, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.

पतसंस्था कर्ज १८०० कोटींच्या जवळ देतात, परत कर्जफेडीचे प्रमाण हे सहा टक्क्यांच्या आत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यक्तीने सहकार संस्था सुरू करून उभारली. ज्या राज्यांमध्ये सहकार चळवळ उभारली आहे, त्यात महाराष्ट्र आहे. खऱ्या अर्थाने या सहकाराला दिशा कशी मिळेल, याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईचा महानगर पालिका स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला तेव्हा मी पहिल्यांदा आलो, त्यावेळी शेती होती. आता मात्र नवीन एकविसाव्या शतकातील शहर उभे राहिले आहे. पतपेढीची इमारत बघितली. सभागृहाला नाव दिले नाही. या सभागृहाला यशवंत सभागृह नाव द्यावे, अशी सूचना करत रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे, चिंता वाटणारी ही गोष्ट आहे. देशात सहकाराची चळवळ महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *