Breaking News

पवार म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करा आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिल्याची राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्यात जे मुद्दे होते. त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या मंत्र्याकडे कामे होती. त्यावर उपाययोजना करण्यात यावी आणि त्यातील आश्वासने पूर्ण करावी अशी स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्याना केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.
या वर्षी जिल्हा परिषदा आणि इतर निवडणूका येत असून त्या अनुषंगाने मंत्र्यांना सुचना करण्यात आल्या. शिवाय महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा निवडणूका लढवता येतील याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव बाबत जे पत्र दिले होते. त्याची बैठक झाल्यानंतर दोन तासाच्या आत एनआयए (NIA) कडे केस वर्ग केली. कायदेशीररित्या ती केस त्यांना देणं बंधनकारक आहे. तो निर्णय झाला असला तरी सेक्शन – १० मध्ये तरतुद आहे की, समांतर चौकशी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे आहे. गृहमंत्र्यांनी याबाबतची प्रक्रिया पुर्ण करुन पवारसाहेबांना माहिती दिली. पवारसाहेबांचा जो आग्रह होता तो ते पुर्ण करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एनपीआर (Npr) हे डाटा कलेक्शन आहे ते आधारच्या माध्यमातून झालेले आहे. एनपीआर (Npr) म्हणजे जे सेन्सेस आहे, त्यामध्ये अतिरिक्त प्रश्नावली केंद्र सरकारने टाकलेली आहे. त्याबाबतीत इतर राज्यांनी कोणती भूमिका घेतली, त्याची काही माहिती नाही. मात्र आमच्या राज्यात तिन्ही पक्ष बसून कुठली प्रश्नावली टाकावयाची, याबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेणार आहे. सेन्सेसचा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याबाबतची तयारी झाली आहे. मात्र प्रश्नावली अजून ठरलेली नाही. त्यावर तिन्ही पक्ष बसून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *