Breaking News

“राज” आदेश, युतीच्या चर्चेत पडू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सूचना

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील आगामी १३ महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आता चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत असून या निवडणूकांबाबतची रणनीती
ठरविण्यासाठी एमआयसी क्लबमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या चर्चेत पडू नका असे आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणुकीचे, सोशल मीडियाचे, निवडणुकीच्या दिवशीचे व्यवस्थापन कसे करायचे? या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकांशी बोलून आणि तिथल्या इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढणे. उमेदवारांची यादी ठरवणे. या सगळ्यांबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली. आता सध्या तरी राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

वॉर्ड रचना बदलली तरी लोकाची नाराजी नाही ना बदलू शकत. मरठी माणसे, हिंदुत्ववादी माणसो शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असं काही नसतं, लोकाची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही. या संपूर्ण कोरोनाच्या कालावधीत ज्या प्रकारचा त्रास लोकाना झालेला आहे. किती वॉर्ड रचना बदलली तरी आजचं मरण उद्यावर ढकलू शकतील पण मरण अटळ आहे हे निश्चत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या सगळ्या जागांवर उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच, मुंबईचं महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न कोणीही केला, तरी गेल्या दिडशे वर्षात हे कोणालाही जमलेलं नाही आणि यापुढेही जमणार नसल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपाला लगावला.

काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधई पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाठी भेटी होत चर्चेच्या फेरी झडल्या. त्यानंतर भाजपा आणि मनसे यांच्या युतीची शक्यता वर्तविण्यात येत होत्या. मात्र आता दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच कार्यकर्त्यांना युतीच्या चर्चेत पडू नका असे आदेश देत आगामी निवडणूकीत एकला चलो रे चा नारा दिल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मनसे नेमके कोणाला नुकसान पोहोचविणार याचे उत्तर त्याचवेळी सर्वांना कळेल.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *