Breaking News

राज ठाकरे म्हणाले, आम्हाला निषेध नोंदवणं माहीत नाही…. मराठी महिला स्त्रीला जागा नाकारल्याच्या घटनेचेनंतरचे पडसाद

गणेश अंनत चतुर्दशी दिवशी अख्खा महाराष्ट्र त्याच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याच्या कामात व्यस्त असताना मुलुंडमध्ये विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवसदन इमारतीत मराठी महिलेला केवळ महाराष्ट्रीयन आहे म्हणून जागा देण्यास नकार देण्याचा प्रकार घडला. त्याचे राजकिय पडसाद चांगलेच उमटले. दरम्यान राज ठाकरे यांनी ट्विट करत आम्हाला निषेध नोंदवणं प्रकार माहित नाहीत.आमच्या पध्दतीने दम दिल्यानंतर त्या बिल्डींगच्या सचिवाने माफीनामा दिल्याची माहिती दिली.

राज ठाकरे म्हणाले, मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिल्याचे सांगितले.

हे ही वाचा

मुंबईत मराठी माणूसच उपरा, “महाराष्ट्रीयन नॉट अलाऊड”

तसेच राज ठाकरे म्हणाले, हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे अशी सूचना राज्य सरकारला केली.

राज ठाकरे पुढे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली. त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे असे आवाहनही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना करत अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे ! असे निक्षून सांगितले.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *