Breaking News

मुंबईत मराठी माणूसच उपरा, “महाराष्ट्रीयन नॉट अलाऊड” धक्कादायक व्हिडीओनंतर मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकच क्षोभ

राज्यात आणि केंद्रात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून मुंबईत गुजराती आणि हिंदी भाषिकांची मराठा माणसांवर दादागिरी वाढत असल्याचे आपण सऱ्हास ऐकले आहे. त्यातच आज तृप्ती देवरूखकर या महिलेने त्यांच्या कार्यालयासाठी भाड्याने जागा बघायला गेल्या तर त्यांना इमारतीतील गुजराती लोकांनी महाराष्ट्रीयन लोकांना इमारतीत परवानगी नाही असे सांगत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे सामाजिक आणि राजकिय वर्तुळात महाराष्ट्राच्या मुंबईत मराठी माणूस उपरा अशी भावना निर्माण झाली आहे. तर राजकिय वर्तुळातून यासंदर्भात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुलुंड येथील शिवसदन इमारतीत बहुतांष गुजराती लोक राहतात. या इमारतीतील रहिवाशांची माहिती नसल्याने तृप्ती देवरूखकर या महिलेने त्यांच्या कार्यालयासाठी भाड्याने जागा मिळते म्हणून इमारतीत गेले असता त्यांना त्या शिवसदन इमारतीच्या सचिवाने महाराष्ट्रीय लोकांना या इमारतीत प्रवेश नाही असे सांगत चक्क प्रवेश नाकारला. तसेच आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना प्रवेश देत नाही, तुम्हाला कुठे जायचे आहे तेथे जा असे सांगत तृप्ती देवरूखकर यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी ज्या मोबाईलमधून रेकॉर्डींग करण्यात येत होते. तो मोबाईलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न सदर गुजराती व्यक्तीने केल्याचे दिसून येत आहे.

आज गणेशचतुर्दशी असल्याने अनेक भाविक आणि मुंबईकर गणरायाला निरोप देण्याच्या धांदलीत असतानाच हे प्रकरण उघडकीस आले आहे.

दरम्यान, राज्य सरकार अर्थात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किसन नगर येथील घरापासून मुलुंड परिसर अगदी जवळ आहे. तेथे ही घटना घडली आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया अद्याप आली नाही.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *