Breaking News

Tag Archives: Marathi

प्रियांकाचा मराठी ‘फायरब्रँड’ तिसऱ्या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवुडपासून हॉलिवुडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील ‘फायरब्रँड’ बनली आहे. असं असलं तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीकडे मात्र पाठ फिरवलेली नाही. जागतिक पातळीवरील चित्रपटांमध्ये अभिनय करतानाच प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रियांकाने आई डॉ. मधू चोप्रा यांच्या सहकार्याने मराठी, पंजाबी, …

Read More »

कुडाळकरांची ‘विच्छा पुरी होणार’ कै. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा 'विच्छा माझी पुरी करा' ने शुभारंभ

मुंबईः प्रतिनिधी राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे ‘विच्छा माझी पुरी करा‘ हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. कै. वसंत सबनीस लिखित आणि कै. दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या या चिरतरुण लोकनाट्याची पर्वणी आता कुडाळमधील रसिकांना लाभणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ‘विच्छा …

Read More »

वैभव बनला स्वामी देवा शप्पथ मालिकेत पाहयला मिळणार

मुंबईः प्रतिनिधी विनोदी अभिनेता अशी ख्याती असलेल्या वैभव मांगलेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. केवळ विनोदी भूमिका न साकारता विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याकडे त्याच नेहमी कल असतो. याच कारणामुळे तो कधी हसवतो तर कधी रडवतो. इतकंच नव्हे तर वैभवचा खलनायकी रंगही प्रेक्षकांनी पाहिला आहे. हाच वैभव आता स्वामीच्या भूमिकेत समोर …

Read More »

वेडा-बी.एफ. चित्रपटात अल्ताफ राजाची पहिल्यांदाच मराठीत कव्वाली १९ जानेवारीला ऐकायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात असतात. याद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवरही प्रभावीपणे भाष्य केले जाते. वेडा या आागामी मराठी चित्रपटाद्वारे असाच काहीसा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदू – मुस्लीम ऐक्य टिकून राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर सारख्या छोट्या गावातील अल्ताफ दादासाहेब शेख यांनी वेडा – बी.एफ. नावाच्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अॅट्रॉसिटी’चित्रपटाचे संगीत प्रकाशन २ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. गीत-संगीताचा सुमधूर साज लेऊन अॅट्रॉसिटी अॅक्ट मागील सत्य ‘अॅट्रॉसिटी’या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांनी अंकुशसोबत लुटला ‘देवा’ सिनेमाचा आनंद

मुंबईः प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातील तसेच समाजातील एक अनुभव संपन्न घटक आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन आजच्या पिढीच्या आगामी वाटचालीसाठी नेहमीच उपयोगी पडत असतात. म्हणूनच तर, त्यांच्या छत्रछायेखाली काही निवांत क्षण घालवण्यासाठी मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीने, ज्येष्ठ नागरिक संघ लक्ष्मी, चीरानगर ठाणे या वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकांसोबत ‘देवा’ सिनेमाचा …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आता अँनिमेशन चित्रपट 'प्रभो शिवाजी राजा' चा जयघोष

मुंबई : संजय घावरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व !  त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच.  त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधिनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच  ‘प्रभो शिवाजी राजा’ या अँनिमेशनपटातून लोकांसमोर …

Read More »

‘ओढ’ चित्रपटाच्या संगीताचे अनावरण

मुंबई: प्रतिनिधी मैत्रीचे वेगळे रूप दाखविणारा ‘ओढ’ हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मराठी चित्रपटाच्या संगीताचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर …

Read More »

विक्रम गोखलेरूपी भगवं वादळ येणार आरक्षण व राजकारणावर आधारीत ‘राष्ट्र’

मुंबईः प्रतिनिधी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कारणामुळे गोखले जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार असतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांच्या नजरा त्या चित्रपटावर खिळतात. लवकरच ते ‘राष्ट्र’ या आरक्षण व राजकारणावर आधारीत आगामी मराठी चित्रपटाद्वारे …

Read More »

आता लग्नाची गंमत पडद्यावर पहायला मिळणार ‘मिसेस देशमुख’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीत आज विविधांगी विषयांवर चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपत कथानकाची निवड करीत असून तितक्याच अनोख्या शैलीत सादरीकरण करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. काही चित्रपट शीर्षकांपासूनच लक्ष वेधून घेण्याचं काम करतात. त्यातीलच एक असलेला आणि नुकताच मुहूर्त झालेला ‘मिसेस देशमुख’ …

Read More »