Breaking News

वेडा-बी.एफ. चित्रपटात अल्ताफ राजाची पहिल्यांदाच मराठीत कव्वाली १९ जानेवारीला ऐकायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात असतात. याद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवरही प्रभावीपणे भाष्य केले जाते. वेडा या आागामी मराठी चित्रपटाद्वारे असाच काहीसा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदू – मुस्लीम ऐक्य टिकून राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर सारख्या छोट्या गावातील अल्ताफ दादासाहेब शेख यांनी वेडा – बी.एफ. नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. नुकताच या सिनेमाचे संगीत प्रकाशन सोहळा पुण्याच्या शनिवार वाड्यावर मोठ्या जल्लोषात पार पडला. टायगर जिंदा है सिनेमातील खलनायक गेवी चहल यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला. याच सिनेमात पहिल्यांदा प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांनी मराठीतून कव्वाली गायली आहे, ते देखील यावेळी उपस्थित होते.

मुंबई क्रिएशन इंटरटेनमेंट आणि मुस्तफा मलिक यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची कथा, पटकथा, सवांद, गीते आणि दिग्दर्शन अल्ताफ शेख यांनी केले आहे. अनेक वर्ष सिनेमा निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. यावेळी अल्ताफ राजा म्हणाले कि, मला आधी मराठी कव्वाली गाणार का असं विचारण्यात आलं. मग मला त्यांनी गाणं पाठवलं जे संपूर्ण मराठीत होतं ते मला आवडलं म्हणून मी होकार दिला परंतु त्यांना माझी एक अट होती ती म्हणजे पुण्यातील करमली दर्वेश दर्ग्यावर ही कव्वाली मला गायला मिळावी.

वेडा – बी.एफ.सिनेमाबद्दल अल्ताफ शेख सांगतात कि, यात हिंदू – मुस्लीम यांच्यातील ऐक्य कसे टिकून राहील हे दाखवण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा असीम भक्त बाबूलाल पठाणच्या (नागेश भोसले) कुटुंबाची ही गोष्ट आहे. ज्याचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. त्याचेही शिवाजी महाराजांवर तेवढेच प्रेम आहे. पुढे त्याची मुलगी आणि बहिण हिंदू मुलांच्या प्रेमात पडतात..पुढे काय होते हे सिनेमात पाहण्यासारखे आहे. सिनेमात नागेश भोसले, विनीत बोंडे, प्राजक्ता देशपांडे, डॉ. विशाखा घुगे, सागर गोरे, विजय नवले, अल्ताफ शेख, शैलेश पितांबरे आणि वृंदाबाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात पोवाडा, कव्वाली, प्रेम गीत, विरह गीत अशा प्रकारांचा समावेश आहे. मोनो अजमेरी यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. १९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *