Breaking News

प्रियांकाचा मराठी ‘फायरब्रँड’ तिसऱ्या मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात

मुंबई : प्रतिनिधी

बॉलिवुडपासून हॉलिवुडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील ‘फायरब्रँड’ बनली आहे. असं असलं तरी तिने भारतीय चित्रपटसृष्टीकडे मात्र पाठ फिरवलेली नाही. जागतिक पातळीवरील चित्रपटांमध्ये अभिनय करतानाच प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रियांकाने आई डॉ. मधू चोप्रा यांच्या सहकार्याने मराठी, पंजाबी, भोजपुरी आणि सिक्कीमी भाषेतील चित्रपटांची निर्मितीही केली आहे. पर्पल पेबल पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या प्रियांकाच्या पहिल्या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस मिळालं, पण त्यानंतर आलेला ‘काय रे रास्कला’ सपशेल अपयशी ठरला. आता प्रियांका आपल्या तिसऱ्या मराठी चित्रपटाकडे वळली आहे. तिच्या या चित्रपटाचं नावच ‘फायरब्रँड’ असं आहे.

प्रियांकाची निर्मिती असलेल्या ‘फायरब्रँड’चं चित्रीकरण आजपासून सुरू करण्यात आलं आहे. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवसापासून हा ‘फायरब्रँड’ चर्चेचा विषय ठरला आहे. उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वर सचदेव अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. उषा जाधव या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत असून गिरीश तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. याशिवाय सचिन आणि राजेश्वरी यांची जोडी प्रथमच या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरुणा राजे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होत आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *