Breaking News

गान कोकिळेला सांगितिक मानवंदना १४ जानेवारीला होणार कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी

भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेल्या व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतातील अनमोल रत्नच आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचं मोजमाप कोणत्याही परिमाणात करणं शक्य नाही. गानकोकिळा म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनीही भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलं आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेकजण गगन भरारी घेत असून अशा या गान कोकिळेच्या कार्याला सांगितिक मानवंदना देण्याच्या उद्देशाने एका संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. “लता मंगेशकर” या शीर्षकाने प्रसाद फणसे व नवरस आर्ट अॅकॅडमी यांनी या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. रविवार १४ जानेवारीला सायं. ६.३० वा. मिनी थिएटर, रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे ही मैफिल रंगणार आहे.

प्रसिद्ध लेखक, पत्रकार व हिंदी सिनेसंगीताचे गाढे अभ्यासक अंबरीश मिश्र हे त्यांच्या अभ्यासपूर्ण,  खुसखुशीत निवेदनातून ‘लतादिदीं’च्या गानप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडणार आहेत. ‘लतादीदीं’ना भेटलेले संगीतकार, सह-गायक, दिग्दर्शक, निर्माते, त्यांचे खुमासदार तसेच हृदयस्पर्शी किस्से असा विविधरंगी खजिनाच ते रसिकांसमोर उलगडणार आहेत. सौ राधिका फणसे व सहकारी कथ्थक नृत्याच्या माध्यमातून ‘लता दिदीं’च्या गीतांवर नृत्यसादरीकरण करणार आहेत. शिवाय रसिकांना ‘लतादिदीं’च्या आवाजातील रचनाही “मेडलीच्या स्वरुपात ऐकता येतील. कार्यक्रमाची संकल्पना प्रसाद फणसे यांची आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *