Breaking News

अखेर काँग्रेसने केली तांबेवर कारवाई डॉ. सुधीर तांबे यांना केले निलंबित

विधान परिषद निवडणूकीसाठी पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे नाव पक्षाकडून निश्चित केलेले असतानाही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काची जागा सोडावी लागली. यापार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची तक्रार प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची आज कारवाई केली.

यासंदर्भात डॉ.सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने चौकशी सुरु केली असून चौकशीच्या कालावधीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे शिस्तभंग समितीचे अध्यक्ष तारीक अन्वर यांच्या सहीने पत्र जारी करत ही करवाई केली.

दरम्यान, डॉ.सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर एकाबाजूला मी काँग्रेसचाच उमेदवार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. तर दुसऱ्याबाजूला पाठिंब्यासाठी भाजपा नेत्यांची भेट घेणार असल्याचेही वक्तव्य केले. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी केलेली बंडखोरी भाजपाच्या इशाऱ्यावर केल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत विचारल्यानंतर योग्य वेळ आल्यानंतर सर्व गोष्टींचा खुलासा होईल असे सांगत सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

या सगळ्या घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सत्यजीत तांबे सोडून इतर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे सत्यजीत तांबे यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत दुरापास्त झालेले असतानाच पक्षाने विद्यमान आमदार तसेच सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *