Breaking News

भाजपाने रासपला फसविले, धोका दिला महादेव जानकर यांच्या निमित्ताने महायुतीतील खदखद बाहेर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेने गतवेळच्याप्रमाणे महायुतीची घोषणा केली. या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधानसभेच्या जागा दिल्या नसल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगत आम्हाला फसविल्याचा जाहीर आरोप भाजपावर केला.
महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिला आहे,” असा आरोप करत दौंड, जिंतूरच्या जागेचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते घेतील असे जाहीर करत या दोन्ही जागांबाबत असहकार्याचे संकेत त्यांनी दिले. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाविषयची मनातील खदखद व्यक्त केली.
भाजपा-शिवसेना महायुतीचे जागा वाटप झाले. उमेदवारांनी अर्जही भरले. जागावाटपात शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या तर भाजपाच्या वाट्याला मित्रपक्षांसह १६४ जागा आल्या आहेत. यात १५० जागांवर भाजपाने स्वतःचे उमेदवार दिले.
जानकर म्हणाले, जागावाटपाचं बोलणं झालं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पण सरळसरळ फसवलं आहे. भाजपाने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या गंगाखेड हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, त्या ठिकाणी रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार असतील अशी घोषणा करत रासपचा उमेदवार असल्याने शिवसेना-भाजपाकडे उमेदवार मागे घेण्याची विनंती करू. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी मित्रपक्षांबाबत केलेले विधान बरोबर असल्याचे वक्तव्यही त्यांनी केला.

Check Also

प्रविण दरेकर यांची टीका, टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव

उद्धव ठाकरेंना केवळ बडबड करण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही. त्यांना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहित, ना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *