Breaking News

मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज अर्थात नामनिर्देशनपत्र मागे घेतलेले उमेदवार मतदारसंघ क्र.१७८- धारावी -पुर्वेश गजानन तावरे (महाराष्ट्र क्रांती सेना), १८२ वरळी – अमोल आनंद निकाळजे (अपक्ष), अंकुश वसंत कुऱ्हाडे (अपक्ष), सचिन दयानंद खरात (अपक्ष), १८६- मुंबादेवी -अब्बास एफ छत्रीवाला (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर शिवाजी जोंधळे यांनी दिली.
मुंबई शहर जिल्हयातील १० मतदारसंघात एकुण ९४ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. त्यापैकी आज ५ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यामुळे एकुण उमेदवारांची संख्या ८९ असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारसंघ निहाय सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :
178- धारावी विधानसभा मतदारसंघ
1. अनिता दिपक गौतम -बसपा
2. आशिष वसंत मोरे- शिवसेना
3. संदिप कवडे -मनसे
4. वर्षा गायकवाड- भा.रा.काँग्रेस
5. गणेश कदम- अखिल भारतीय हिंदू महासभा
6. मनोज संसारे -ए.आय.एम.आय.एम.
7. रविंद्र अंगारखे -बहूजन मुक्ती पार्टी
8. गिरीराज शेरखाने -अपक्ष
9. राजु दळवी -अपक्ष
10. बबिता विजय शिंदे -अपक्ष
11. विकास मारुती रोकडे -अपक्ष
179- सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ
1. अनंत लक्ष्मण कांबळे -मनसे
2. कॅप्टन आर. तमिल सेल्वन -भाजप
3. गणेश नबी राजन यादव- भा.रा.क्राँग्रेस
4. विजय अशोक दळवी- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
5. विलास कांबळे -बसपा
6. अमिरुद्दीन अलकमर निजामुद्दीन- वंचित बहुजन आघाडी
7. आतादिप रघुनाथ जाधव- शेकाप
8. ॲङ श्रीमती अश्विनी कसबे- प्रबुध्द भारत प्रजासत्ताक पार्टी
9. बाळा व्यंकटेश नाडार- आपकी अपनी पार्टी (पिपल)
10. शांता राजन नायर -बहुजन महापार्टी
11. समसेलम गुलामहुसेन- शेख पिस पार्टी
180- वडाळा विधानसभा मतदारसंघ
1. आनंद मोहन प्रभू -मनसे
2. कालिदास कोळंबकर- भाजप
3. शिवकुमार लाड -भा.रा.काँग्रेस
4. मो.इर्शाद खान -ऑल इंडिया मायनॉरिटी फ्रंट
5. यशवंत शिवाजी वाघमारे- अपक्ष
6. लक्ष्मण काशिनाथ पवार- वंचित बहुजन आघाडी

181-माहिम विधानसभा मतदारसंघ
1. यशवंत सुधाकर देशपांडे (संदिप देशपांडे)- मनसे
2. सदानंद शंकर सरवणकर- शिवसेना
3. प्रविण जगन्नाथ नाईक -भा.रा.काँग्रेस
4. मोहनीश रविंद्र राऊळ -अपक्ष
182- वरळी विधानसभा मतदारसंघ
1. अदित्य ठाकरे- शिवसेना
2. विश्राम पदम -बसपा
3. सुरेश तात्याबा माने- भा.रा.काँग्रेस
4. गौतम अण्णा गायकवाड- बहुजन वंचित आघाडी
5. प्रताप बाबुराव हवालदार -प्रहार जनशक्ती पार्टी
6. किसन बनसोडे -भारतीय मायनॉरिटी सुरक्षा संघ
7. अभिजीत बिचकुले- अपक्ष
8. नितीन विलास गायकवाड- अपक्ष
9. महेश खांडेकर -अपक्ष
10. मिलिंद काशीनाथ कांबळे- अपक्ष
11. मंगल राजगौर -अपक्ष
12. रुपेश लालचंद तुर्भेकर- अपक्ष
13. विजय जर्नाधन सिकतोडे -अपक्ष
183- शिवडी विधानसभा मतदारसंघ
1.अजय चौधरी- शिवसेना
2. उदय फणसेकर- भा.रा.काँग्रेस
3. मदन हरिश्चंद्र खळे- बहुजन समाज पार्टी
4. संतोष नलावडे -मनसे
184-भायखळा विधानसभा मतदारसंघ
1. कृपाशंकर जैसवार- बहुजन समाज पार्टी
2. मधुकर बाळकृष्ण चव्हाण- भा.रा.काँग्रेस
3. यामिनी यशवंत जाधव- शिवसेना
4. अब्दुल हमीद शेख -इंडियन युनियन मुस्लीम लिग
5. गिता गवळी- अखिल भारतीय सेना
6. मो.नईम शेख- ऐम पॉलीटीकल पार्टी
7. रशीद अब्दुल खान- बहुजन महापार्टी
8. वारिस युसुफ पठाण- ए.आय.एम.आय.एम.
9. एजाज खान -अपक्ष
10. फ्रान्सिस सॅबेस्टीन डिसोझा- अपक्ष
11. समीर सल्लाउद्दीन ठाकूर -अपक्ष
185- मलबार हिल विधानसभा मतदारसंघ
1. मंगल प्रभात लोढा -भाजपा
2. विशाल सोपान गुरव- बसपा
3. हिरा नवासी देवासी -भा.रा.काँग्रेस
4. अभय सुरेश कठाळे -नॅशनल युथ पार्टी
5. अर्जुन रमेश जाधव -भारतीय मानवाधिकार फेडरेशन पार्टी
6. मोहम्मद महताब शेख- बहुजन मुक्ती पार्टी
7. सय्यद मोहम्मद अरशद -एम पॉलिटीकल पार्टी
8. राजेश शिंदे -अपक्ष
9. शंकर सोनावणे- अपक्ष
10. सत्येंद्र सिंह -अपक्ष
186- मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
1. मो.नईम शेख ऐम -पॉलिटीकल पार्टी
2. अमीन पटेल -भा.रा.काँग्रेस
3. पांडूरंग गणपत सकपाळ- शिवसेना
4. नजीब मोहम्मद सय्यद- सरदार वल्लभाई पटेल पार्टी
6. बशीर मुसा पटेल -ऐ .आय .एम.आय.एम.
7.उदयकुमार रामचंद्र शिरुरकर- अपक्ष
8.वारीस अली शेख- बहुजन समाज पार्टी
9.मोहम्मद जुनेद शेख -अखिल भारतीय सेना
10.केशव रमेश मुळे- मनसे
11.नजीर हमीद खान -इंडियन युनियन मुस्लीम लिग
12.शमशेर खान पठाण- वंचित बहुजन आघाडी
187- कुलाबा विधानसभा मतदारसंघ
1. अशोक अर्जुनराव जगताप- भा.रा.काँग्रेस
2. राहुल सुरेश नार्वेकर- भाजपा
3. अर्जुन गणपत रुखे -बहुजन समाज पार्टी
4. राजेंद्र दौलत सुर्यवंशी- अेम पॉलिटिकल पार्टी
5. जितेंद्र रामचंद्र कांबळे -वंचित बहुजन आघाडी
6. अमोल तुळशीदास गोवळकर- क्रांतीकारी जयहिंद सेना
7. संतोष गोपीनाथ चव्हाण -अपक्ष
8. भरत पुरोहित -अपक्ष

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *