Breaking News

Tag Archives: vidhansabha election-2019

नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर क्षितीज ठाकूर विजयाच्या उंबरठ्यावर

मुंबईः प्रतिनिधी चकमेकफेम माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा हे निवडणूकीच्या रिंगणात उतरून राजकारणात आपले नशीब अजमावत होते. परंतु त्यांना पोलिसीगिरीतील दंबगशाही काही राजकारणात सध्यातरी दाखविता आली नाही. त्यांना ३६ हजार ७८० मते मिळून पिछाडीवर आहेत. तर तेथील विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना ५९ हजार ९१३ मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय …

Read More »

वंचित आघाडीने रिसोडमध्य़े खाते उघडले अकोट, मुर्तिजापूरात आघाडीवर वंचित

मुंबईः प्रतिनिधी राज्यात लोकसभेनंतर विधानसभेसाठी रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने रिसोडमध्ये आपले खाते उघडले आहे. वंचितचे उमेदवार दिलीप जाधव हे विजयी झाले असून शेजारील मुर्तिजापूर येथेही वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार या ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तसेच अकोटमध्ये संतोष रहाटे हे ही आघाडीवर आहेत. Share on: WhatsApp

Read More »

पंकजा मुंडे, राम शिंदे, मेहता पराभवाच्या छायेत धनंजय मुंडे, राम शिंदे, गीता जैन यांचा विजय निश्चित

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतमोजणीची सुरु आहे. या मतमोजणीत परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे १२ हजारहून अधिक, तर कर्जत-जामखेडमधून रोहीत पवार हे १३ हजारहून अधिक आणि मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन या १२ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपाचे पंकजा मुंडे, राम शिंदे, नरेंद्र मेहता …

Read More »

राज्यावर ४ लाख कोटींच कर्ज केलं पण विकास किती झाला ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल

वर्धा – हिंगणघाटः प्रतिनिधी एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला …

Read More »

मुंबईत सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी घेतली माघार एकूण उमेदवार ८९ रिंगणात

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूक-२०१९ मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत १० विधानसभा मतदार संघात सर्वाधिक उमेदवार वरळी आणि मुंबादेवी मतदारसंघात आहेत. यातील वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. तर मुंबईदेवी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ३ मतदारसंघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज …

Read More »

कोल्हापूरकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील घाबरले पुण्यातून घेतली उमेदवारी

कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी कृष्णा आणि पंचगंगेला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर जिल्हा पूर्णतः पाण्याखाली गेला. मात्र कोल्हापूरचे रहिवासी असलेले राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करवीरवासीयांच्या मदतीला धावण्याऐवजी पुण्यात राहणे पसंत केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या टीकेची परिणती विधानसभा निवडणूकीत होवू नये म्हणून नियोजित शिराळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी …

Read More »

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष बागडे यांच्याकडून मंजूर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच विद्यमान विधानसभा सदस्यत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी राजीनामा आज दिला. विशेष म्हणजे त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जावून दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. राज्य शिखर बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्यात राष्ट्रवादी …

Read More »

घरबसल्या एका क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती मतदात्यांसाठी निवडणूक आयोगाची खास वेबसाईट

मुंबई : प्रतिनिधी मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा समावेश आहे. अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानादिवशी मतदारयादीतील …

Read More »

अधिसूचना जारी, उमेदवारी अर्ज आजपासून दाखल होणार निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेस सुरूवात

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमास आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून निवडणूकीसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल आता करता येणार आहे. राजकिय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आजपासून दाखल करता येणार आहे. राज्यातील सर्वच ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना प्रसिध्द …

Read More »

मतदानामुळे २१ आणि २२ ऑक्टोंबर रोजीच्या परिक्षांचे फेरनियोजन मुंबई विद्यापीठाकडून प्रसिध्दी पत्रक जारी

मुंबई : प्रतिनिधी २१ ऑक्टोबर, २०१९ रोजीची विधानसभा निवडणूक मतदान लक्षात घेता परीक्षा विभाग मुंबई विद्यापीठाने दि.२१ व २२ ऑक्टोबर या दोन तारखांच्या नियोजित परीक्षांचे फेरनियोजन केले आहे. जेणेकरून मतदान प्रक्रिया व परीक्षांचे वेळापत्रक या दोन्ही जबाबदारी विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून पार पडता येतील. २१ व २२ ऑक्टोबर या …

Read More »