Breaking News

सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका, महाराष्ट्रात ५ टप्यात

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी रोजी संपत आहे. परंतु त्याआधी देशात नवे सरकार अस्तित्वात येणे राज्यघटनेनुसार बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमधील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला. या संपूर्ण देशभरात निवडणूका ७ टप्प्यात होणार आहेत. तर जून मध्ये मतमोजणी होणार आहे. परंतु महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमध्ये ५ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहेत देशातील सर्व राज्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी जून महिन्यात होणार आहे. याशिवाय ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका जाहिर घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी माहिती देताना म्हणाले की, अरूणाचल प्रदेश, अंदमान व निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळा, लक्ष्यद्वीप, लडाख, मिझोरम, मेगालय, नागालॅन्ड, पंद्दुचुरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

तसेच पुढे बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर आदी राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया दोन टप्प्यात पार पाडण्यात येणार आहे. तर छत्तीसगड आणि आसाममध्ये तीन टप्प्यात, चार टप्प्यात ओरिसा, मध्य प्रदेश, झारखंड राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर राज्यात टप्प्यात निवडणूका प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य असल्याने आणि बिहार मध्ये तेथील स्थानिक उत्सवाच्या निमित्ताने पश्चिम बंगाल मध्ये सात टप्प्यात निवडणूकीची प्रक्रिया पार पडण्यात येणार असल्याचेही सांगितले.

याशिवाय देशातील राज्यातील अनेक विधानसभेच्या जागा रिक्त असून त्या सर्व ठिकाणी पोटनिवडणूकाही याच कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोट निवडणूका आणि काही राज्यातील विधानसभेच्या निवडणूका व लोकसभेच्या निवडणूका पार पाडण्यात येणार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन मतदान घेणार
पुढे बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, देशात आजस्थितीला ९६.८ कोटी मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जे तरूण अर्थात पहिल्यांदा मतदान करण्यासाठी आलेले असतील त्यांनाच आपण भयमुक्त निवडणूक म्हणून आपण एकप्रकारे त्यांना अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करणार आहोत. जेणेकरून निवडणूकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकामध्ये उत्साही वाटलं पाहिजे. तसेच जे ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार असतील अशा मतदारांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे शक्य होणार नसेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन मतदान घेण्यात येणार असल्याचेही सांगितले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *