Breaking News

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या तारखा माहित आहेत का? घ्या जाणून

केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येतात. मात्र २०१४ नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन किंवा चार टप्प्यात लोकसभा निवडणूका देशात आणि राज्यात घेतल्या होत्या. परंतु २०१४ सालानंतर २०१९ आणि २०२४ होत असलेल्या निवडणूक प्रक्रियांचे टप्पे पाहिल्यास भौगोलिक स्थिती पठारी (सपाट) भागासारखी असलेल्या राज्यातही एक किंवा दोन टप्प्यात निवडणूका होत असताना अशा कारण नसताना बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यामध्ये तीन पेक्षा जास्त टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत.

२००९ साली महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. तसेच त्यावेळी देशातील बहुतांष राज्यातील लोकसभा निवडणूकीच्या तारखा एकाच वेळच्या जाहिर करण्यात आल्या होत्या. तर उर्वरित राज्यांमधील त्या कालावधी नंतरच्या. परंतू प्रत्येक टप्प्यात ५० ते १०० जागांसाठी किंवा त्याहून जास्त जागांसाठीच्या निवडणूकांचा टप्पा पार पाडण्यात आल्या होत्या. गतवेळी महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. मात्र यंदाच्या वर्षी जम्मू काश्मीरमधील राजकीय-सामाजिक परिस्थितीशी जोडून सात टप्प्यात निवडणूका घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर मध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात २१ राज्यातील १०२ जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया २६ एप्रिल २०२४ रोजी सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ८९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यातील ९४ लोकसभेच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार ७ मे २०२४ रोजी पाडण्यात येणार आहे. चवथ्या टप्प्यात १३ मे २०२४ रोजी १० राज्यातील ९६ लोकसभा जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

तर पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे २०२४ रोजी ८ राज्यातील लोकसभेच्या ४९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. याशिवाय ६ व्या टप्प्यात २५ मे २०२४ रोजी ७ राज्यातील लोकसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात अर्थात १ जून २०२४ या अखेरच्या टप्प्यात ८ राज्यातील लोकसभेच्या ५७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर या सर्व राज्यातील ५४८ लोकसभा उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची मतमोजणी ६ जूनला होणार आहे. त्यानंतर आजपासून लागू झालेली आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेला कार्यक्रम पाहिला तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकला लागू असलेल्या राज्यांमध्ये टप्पेनिहाय मतदानाची प्रक्रिया पडताना दिसत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *