Breaking News

एमआयडीसीवरून रोहित पवार यांचे आंदोलन, तर अजित पवारांची स्पष्टोक्ती, अधिवेशन संपायचाय.. रोहित पवार यांच्याऐवजी अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

अहमदनगर मधील कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ मात्र येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यास राज्य सरकारने मंजूरीही दिली होती. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यास अद्याप मंजूरी देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन सुरु केले.
भाजपा प्रणित सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते असलेल्या अजित पवार यांनी आणि त्यांच्यासोबतच्या ८ आमदारांनी सहभाग घेत पाठिंबा दिला. राष्ट्रवादीतील बंडानंतर विधिमंडळाचे पहिलेच अधिवेशन आहे. मात्र या अधिवेशनात पवार विरूध्द पवार असा काही काळ संघर्ष पहायला मिळाला.

दरम्यान, यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आंदोलनावरून विरोधकांना समज दिली. त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या पायऱ्यांवर आंदोलन करायचं नाही हा निर्णय सभागृहात एकमताने झाला होता. त्याबाबत आम्ही रोहित पवारांना आवाहन केलं आहे. माझी विनंती आहे की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी त्यांची समजूत घालावी. रोहित पवारांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं, असं आवाहन राहुल नार्वेकर यांनी केले.

मात्र या आंदोलनाच्या अनुषंगाने विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमख यांनी कर्जत-जामखेड येथील नियोजित एमआयडीसी संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

त्यास उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, अनिल देशमुखांनी विधिमंडळ सदस्यांबाबत (रोहित पवार) एक मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भातल्या एका पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी १ जुलै २०२३ ला रोहित पवारांना पत्र दिलं आहे. या पावसाळी अधिवेशनात संबंधितांसमवेत बैठकीचं आयोजन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा असं पत्र उदय सामंतांनी दिलं. मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही. एकच आठवडा झालेला आहे. आत्ताच दुसरा आठवडा सुरू झालाय. लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं उचित नाही, असं अजित पवार यावेळी उत्तरात म्हणाले.

आमदार रोहित पवार आज सकाळपासून विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर व्हावी, या मागणीसाठी रोहित पवारांनी आंदोलन केलं होतं. विधानसभेतही या मुद्द्यावर चर्चा झाली. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *