Breaking News

Tag Archives: midc

संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल

देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. मोशी येथील …

Read More »

रिलायन्स कंपनीला दिलेल्या पाच विमानतळांचा ताबा राज्य सरकार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एमआयडीसीला आदेश

राज्यात २००९ साली शासकिय जमिनीवरील विमानतळांचा विकास आणि तेथील प्रवाशी व्यवस्था सुरु करण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला पाच विमानतळे चालविण्यासाठी देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा समावेश होता. ही पाचही विमानतळे रिलायन्स कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यानंतरही मात्र, गेल्या १४ वर्षांत …

Read More »

अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …

Read More »

एमआयडीसीवरून रोहित पवार यांचे आंदोलन, तर अजित पवारांची स्पष्टोक्ती, अधिवेशन संपायचाय.. रोहित पवार यांच्याऐवजी अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

अहमदनगर मधील कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ मात्र येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यास राज्य सरकारने मंजूरीही दिली होती. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यास अद्याप मंजूरी देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांनी विधिमंडळ …

Read More »

धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही

राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …

Read More »

जिंदाल कंपनी करणार राज्यातील या जिल्ह्यांमध्ये ३५,५०० कोटींची गुंतवणूक एमआयडीसी आणि जेएसडब्लू मध्ये सामंजस्य करार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज नामांकित जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आज झालेल्या करारांनुसार जेएसडब्ल्यू कंपनी Hydro व पवन उर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य …

Read More »

राज्य सरकार देणार उद्योगांना व्याजमाफी पण या गोष्टीसाठी उद्योग विभागाची 'विशेष अभय योजना'; बंद उद्योगांनी शासकीय देणी भरल्यास व्याजमाफी

मुंबई : प्रतिनिधी पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद उद्योग घटकांकडील शासकीय देणी थकीत असल्यास, त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम घटकाने एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम माफ करून, त्या उद्योग घटकाची स्थिर मालमत्ता अन्य उद्योग घटकाकडे हस्तांतरीत करण्यास विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. लाभासाठी निकष एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद …

Read More »

लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुख्यमंत्र्यांनी घेतली कोविड संदर्भात प्रमुख उद्योजक आणि चित्रपट-दूरचित्रवाणी निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

खर्डी आणि अंबरनाथमधील जमिनीत एमआयडीसीतील कोणाचा रस? डोंगराळ आणि संवेदनशील पर्यावरण भागातील जमिनीची खरेदी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्योजकांना सहजरीत्या जमिनी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसीकडून प्रत्येक जिल्ह्यात-शहरात जमिनीची खरेदी केली जाते. याचाच भाग म्हणून एमआयडीसीने वाशिंद-शहापूरच्या दरम्यान संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात मोडणारी १ हजार एकर आणि अंबरनाथ मधील डोंगराळ असलेली जमिन जी कोणत्याही स्वरूपात उद्योग उभारणीसाठी अनुकूल नसताना का खरेदी केली …

Read More »