Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, भारतीयांना हिंदूत्व म्हणजे काय ? याचे उत्तर हवेय केवळ एकमेकांचा द्वेष म्हणजे हिंदूत्व नव्हे

भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची आपल्याला गरज नाही. हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांचा गोरेगाव मुंबई येथे उत्तर भारतीय बांधवांच्या समवेत मराठी आणि हिंदीतून संवाद आज रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी साधला. त्यावेळी ते बोलत होते.

उध्दव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही. २५-३० वर्ष एक राजकीय मैत्री आम्ही जोपासली. काय मिळाल आम्हाला. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. अकाली, शिवसेना नको होती त्यांना. राजकारणात त्यांना अस्पृश्य मानले जोत होते, अशी तेव्हा वाईट दिवसात भाजपाशी युती केली. तेव्हा बाळासाहेबांनी आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे पालन करणार होते. तेव्हा काळाची गरज म्हणून बाळासाहेबांनी शब्द टाकला. तसे झाले नसते तर आज ते इथवर आले असते का? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

बाळासाहेबांनी कधीही द्वेषभावना ठेवली नाही. आम्ही हिंदू म्हणजे केवळ मराठी आहोत असे नाही आणि हिंदी भाषिकांचा द्वेष करा अशी आमची कधीच भावना आणि कृती नव्हती. हिंदू म्हणजे आपण सगळे एकच. देश विरोधात कुठलाही धर्मीय असो तो आमचा शत्रूच ही बाळासाहेबांची आम्हाला शिकवण. आम्ही भाजपाची साथ सोडली हिंदुत्व नव्हे. आम्ही काल, आज आणि उद्यापण हिंदूच. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही. त्यांचे हवे तसे हिंदुत्व मी मानत नाही असा इशाराही भाजपाला दिला.

आज चांगला मुहूर्त असून उत्तर भारतीयांच्या समवेत आम्ही आज आलो आणि आज कुरिअरने पार्सल परत जातय. ताकाला जाऊन भांडे आम्ही लपवत नाही. आमच्यातले काही गळ्यात पट्टा घालून त्यांच्या मागे गेले अशी खोचक टीका शिंदे गटावर करत मला बाळासाहेबांनी कुणाची गुलामी करायला नाही शिकवले. मोदीजी परवा आपल्या पोळ्या भाजून गेले. हेच मी केले असते तर? मी बोहरा समाजाच्या विरोधात नाही. त्यांनी केले तर सगळं माफ आम्ही केले तर गुन्हा. तो चष्मा आता बदलायला हवा. सगळ्यांसाठी आमच्या मनात चांगल्याच भावना आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जायचे आहे. दोन वेळा शिवसैनिक रस्त्यावर उतरला १९९२-९३ आणि मी मुख्यमंत्री असतांना कोरोना काळात. मी कधीच मराठी अमराठी, हिंदू मुस्लमान असा भेदभाव केला नाही. आपण पाच वर्ष एकत्र असतो, शाखेत येतात पण निवडणुकीत का वेगळे होतो? ही भाजपाची इंग्रज नीती असल्याचा आरोप करत ह्यांना फक्त सत्तेच्या घोड्यावर बसायचे असून इतरांनी भांडायचे का असा सवालही केला.

उध्दव ठाकरे म्हणाले, मी डोळे उघडायला आलोय द्वेष वाढवायला आलोय असा आरोप नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून करत असाच कारभार सुरु राहिला तर हिंदुत्व धोक्यात. गर्व से कहो हम हिंदू ही घोषणा माझ्या वडिलांनी दिली. २०१८ साली मी रामलल्लाच्या दर्शनाला गेलो, शिव जन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो. शरयू मातेची आरती केली. कुणी मान्य करो अथवा नाही, पण त्यानंतर राम मंदिरावर न्यायालयाचा निकाल आला. मी मुख्यमंत्री पण झालो. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व असल्याचे स्पष्ट करत ह्दयात राम आणि हाताला काम हेच आपले ध्येय असल्याचा पुर्नरूच्चारही केला. अनेक वर्षांनी बाळासाहेबांच्या वेळची सर्व लोक आज पुन्हा भेटतायत. एक चांगली एकजूट होतेय. सर्वसामान्यांच्या स्वप्नातला एक राष्ट्र निर्माण करायचे आहे. परवा जैन बांधवांच्या कार्यक्रमात गेलेलो ते म्हणाले उध्दवजी आप खून माँगोगे तो खून भी देंगे, मी म्हणालो खून नही सिर्फ वोट दिजीए. आता स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी एकत्र यायलाच हवे. अजून काही लोकांशी संवाद साधायचा आहे. मग जाहीर सभा घेऊ असेही जाहीर केले.

आताही भाजपाची निवडणुक घेण्याची हिंमत होत नाहीए. हिंमत नाही आणि हिंदूंचे नेतृत्व करतायत अस यांचे म्हणणे. हिंदू असा लेचापेचा नाही, घ्या निवडणुका मी आज पुन्हा त्यांना आव्हान देतो. आपण भेदभावाच्या भिंती उभारल्या तर आपले स्वातंत्र्य धोक्यात. आपले ऐक्य हीच आपली शक्ती. म्हणूनच आपल्याला एकत्रित राहावे लागेल. मधल्या काळात काही गैरसमज निर्माण झाला होता तो आज दूर करुन हातात हात घालून आपण पुढे जाऊ असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *