Breaking News

केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आर्मी जवानांचे काम सुरु जेवण बंद आंदोलन उद्यापासून देशभरात आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी

देशभरातील ४१ आर्मी डेपोतील २५० सेवांसह उत्पादनांच्या निर्मितीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने घेतला. त्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागातील जवळजवळ ४१ विभागातील कर्मचाऱ्यांनी काम सुरु जेवण बंद असे अभिनव आंदोलन उद्या ११ जानेवारी रोजी करणार असून देशभरातील लष्कराच्या कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एआयडीईएफचे सरचिटणीस सी.श्रीकुमार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

संरक्षण दलाच्या अखत्यारीत येत असलेल्या डीआरडीओ, डीजीक्युए, स्ट्रँटेजिक युनिफॉर्म, वर्कशॉप डिपोमधील २५० सेवा आणि उत्पादनांचे खाजगीकरण व आऊट सोर्सिंग करण्याचा निर्णय संरक्षण दलाने घेतला. त्या विरोधात लष्करातील जवळपास ४ लाख कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याने या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय लष्करी जवानांनी घेतला. त्यामुळे एआयडीईएफ, इंटक, बीएमएस या संघटनांनी या विरोधात आवाज उठविला असून त्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

हे आंदोलन जवळपास दोन महिने करण्यात येणार असून आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी अर्थात १५ फेब्रुवारी आणि १५ मार्च रोजी या तिन्ही संघटनांच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. तसेच या निमित्ताने खाजगी कंपन्यांना देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत थेट सहभागी होणार आहेत. त्यामुळे भविष्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे संरक्षण विभागाने खाजगीकरणाच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *