Breaking News

छगन भुजबळ यांना पाडल्यास मराठ्यांचे १६० आमदार पाडू

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता ओबीसी नेत्यांनीही पुढाकार घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे . मराठा नेत्यांकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करून निवडणुकीत पाडण्याचा ईशारा दिला गेल्याने आता भुजबळांच्या मदतीला ओबीसी नेतेही उतरले असून भुजबळांना पडल्यास राज्यात ६० टक्के लोकसंख्या असलेले ओबीसी, मराठ्यांचे १६० आमदारपाडतील असा ईशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांनी ठाम विरोध केला आहे . भुजबळ हे यासंदर्भात सतत आपली भूमिका मांडत आल्याने मनोज जरांगे – पाटील यांच्याकडून भुजबळ याना टार्गेट केले जात आहे शिवाय अन्य मारताच नेत्यांनीही आगामी निवडणुकीत भुजबळ याना धडा शिकविण्याचा ईशारा दिला आहे . या इशाऱ्यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे संतप्त झाले असून मराठा-ओबीसी नेत्यांकडूनदेखील एकमेकांविरोधात भूमिका घेतल्या जात आहेत. तुम्ही छगन भुजबळ याना पडण्याचा इशारा देत आहात महाराष्ट्रात ६० टक्के ओबीसी समाज आहे. तो प्रत्येक मतदारसंघात आहे यांची आठवण करून देत तुम्ही एका भुजबळांना पाडलात तर आम्ही तुमचे १६० मराठा आमदार पाडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *