न्युज क्लिक या संकेतस्थळाला परदेशातून फडींग होत असल्याच्या संशय होता. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील न्युज क्लिक या संकेतस्थळाच्या कार्यालयावर आणि संकेतस्थळाशी संबधित व्यक्तींच्या घरांवर सीबीआय ने धाडी टाकत कॉम्प्युटर, हार्ड डिस्क यासह अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या. न्युज क्लिक या संकेतस्थळाला श्रीलंकेन वंशाचे आणि आता चीनच्या शांघाईत स्थाईक झालेले नेविल रॉय सिंघम याच्या ट्रस्टकडून फंडींग करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सीबीआयने केलेल्या ED ने नव्याने नविल रॉय सिंघम यांना चौकशीसाठी नोटीस बजाविल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान सीबीआयने चौकशीसाठी यापूर्वी नविल रॉय सिंघम यांनी परदेशातून मदत देणाऱ्या फेरा कायद्याचे उल्लघंन केल्याचा आरोप सीबीआयने केला होता. मात्र नविल रॉय सिंघम यांनी सीबीआयच्या या आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर ED ने आज पुन्हा नोटीस बजावली.
पीपीके न्युज क्लिक स्टुडिओ प्रा.लि. संचालक प्रबीर पुरकायस्था आणि जेसन पेफेचर (Jeson Pfetcher), जे पूर्वीचे अमेरिकास्थित वर्डवाइड मिडीया होल्डींग प्रा.लि. चे व्यवस्थापक होते. न्युज क्लिक या संकेतस्थळाचे एचआर व्यवस्थापक अमित चौधरी यांना युएपीए आणि फेरा कायद्यातील तरतूदींचा भंग केला म्हणून यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
नेविल रॉय सिंघम यांच्या कंपनीने न्युज क्लिक संकेतस्थळाला २८.४६ कोटी रूपयांचा निधी दिला. फेरा कायद्यांतर्गत ९.५९ कोटी रूपयांपर्यंतच परदेशातून देता येतो. त्यामुळे परदेशी गुंतवणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचे सांगत हरकत घेत ठपका ठेवला.
तसेच न्युज क्लिकचे लेखक, स्तंभलेखक, व्हिडिओ बनविणाऱ्या सर्वांच्या संपर्कात नेविल रॉय सिंघम हे होते. तसेच हे सर्वजण भारताचा नकाशा जम्मू काश्मीर, अरूणाचल प्रदेश आणि इतर विवादीत भूभागाशिवाय तयार करण्याच्या चर्चेत जाणीवपूर्वक सहभागी होते. तसेच भारतीय कर चुकवेगिरी प्रकरणी सध्या खटला सुरु असलेल्या दोन चायना टेलिकॉम कंपनीला कायदेशीर मदत करण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.