Breaking News

माजी मंत्री पाटील-चाकूरकर यांच्या चुलतभावाने का केली गोळी झाडून आत्महत्याः वाचा नेमके कारण आत्महत्येपूर्वी सर्वांना व्हॉट्सअपवरून गुड बायचा मेसेज

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूर हा येथील “देवघर” या निवासस्थानी हनमंतराव पाटील (वय ८५) यांनी रविवारी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. हनमंतराव पाटील हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे सख्खे चुलत बंधू असून ते मूळचे चाकुर येथील रहिवासी होते.

त्यांनी पुतणे तथा शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश पाटील यांच्याशी काही विषयांवर चर्चाही केली. त्यानंतर शैलेश पाटील बाथरूम मध्ये गेले तेव्हा हनुमंत पाटील यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. शैलेश पाटील बाथरूममधून बाहेर आले तेव्हा त्यांना हनमंतराव पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आलं नाही. लातूर पोलीस तपास करत आहेत.

चंद्रशेखर उर्फ हनमंतराव पाटील चाकूरकर लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. ते दररोज सकाळी फिरायला बाहेर जायचे. फिरून आल्यानंतर ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी येत आणि चहा पाणी झाल्यावर तेथेच पेपर वाचत बसायचे. यानंतर बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी जात असत. ही त्यांची अनेक वर्षांपासूनची सवय होती.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक अगदी कमी वेळा लातूरमधील निवासस्थानी असायचे. रविवारी (५ मार्च) शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते. नियमितप्रमाणे हनमंतराव पाटील चाकूरकर हे घरात आले. त्यानंतर शैलेश चाकुरकर यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असं सांगून ते गेले.

काहीवेळाने घरात गोळी झाल्याचा आवाज झाला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील धावत हॉलमध्ये आले. तेव्हा त्यांना हनमंतराव पाटील चाकूरकर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

हनमंतराव पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती करायचे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. या सर्वांची लग्ने झाली आहेत. ते सध्या एका मुलाबरोबर चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. ते सततच्या आजारपणाला कंटाळल्याचंही सांगितलं जात आहे.

घरात सून, मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी फारसं कुणी नसणाऱ्या शिवराज चाकुरकरांच्या घरात आत्महत्या केल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. हनमंतराव पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनमंतराव पाटील चाकूरकर यांची ‘बायपास सर्जरी’ झाली होती. अशातच त्यांना इतरही अनेक व्याधी जडल्या होत्या. या सततच्या आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून हे कृत्य केले असावे.

विशेष म्हणजे रविवारी सकाळी आत्महत्या करण्याआधी हनमंतराव चाकूरकर यांनी स्वतःच्या मोबाईलमधील परिचित असलेल्या अनेकांना टेक्स्ट मेसेज करत ‘गूड बाय’ म्हटलं होतं. काहीवेळाने ‘गूड बाय’ असं व्हॉट्सअप स्टेटसही ठेवलं. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *