Breaking News

गोडसेनीतीचा महिमा मोदीसरकार आल्यानंतर वाढला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम

गुजरातमधील वलसाड येथील खाजगी शाळेत महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या नावावर माय रोल मॉडेल नथुराम गोडसे या विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी येथील युथ डेव्हल्पमेंट अधिकारी मिता गवळी यांना निलंबित करण्यात आले आहे.

वलसाड येथील खाजगी शाळेतील ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तीन विषय ठेवण्यात आले होते. मला पक्षाप्रमाणे आकाशात झेप घ्यायला आवडते, मला शास्त्रज्ञ व्हायला आवडेल परंतु मी अमेरिकेला जाणार नाही, आणि माझा आदर्श किंवा हिरो नथुराम गोडसे असे तीन विषय निश्चित करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांने नथुराम गोडसेवर भाषण केले त्या  विद्यार्थ्याला वकृत्व स्पर्धेत विजयी ठरविण्यात आले आहे.

या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, गोडसे नीतीचा महिमा वाढवणे… त्याच्या विचारांना प्रोत्साहन देणे हे मोदी सरकार आल्यानंतर देशभरात हळूहळू वाढत चालल्याचा आरोप केला.
आठ वर्षे महात्मा गांधी यांचं नांव घेऊन नुसते कार्यक्रम करायचे. महात्मा गांधी यांचं नाव घेतलं नाही तर जग आणि देशभरात राजकारण करता येत नाही हे मोदींना मान्य आहे. पण
गुजरातमध्ये नथुराम गोडसे माझा नायक हा विषय समोर येत असेल तर ते योग्य नाही. आठ वर्षात गोडसेचा महिमामंडळ जोरात सुरू आहे ही सत्य परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच गांधीवाद्यांनी गुजरात मधील या कृतीवर चांगलीच टीका करत याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *