Breaking News

माजी खासदार निलेश राणे यांनी जाहिर घेतला राजकीय संन्यास भाजपाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून संन्यास घेतल्याची चर्चा

सिधुंदुर्ग-रत्नागिरीचे माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी आज दुपारी आपण राजकिय संन्यास घेत असल्याचे जाहिर एका ट्विटमार्फत जाहिर केले. निलेश राणे यांनी राजकिय संन्यास घेतल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहिर करताच कुडाळ नगरपरिषदेचे काही नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती पुढे येत आहे.

वासत्विक पाहता रत्नागिरी लोकसभा मतदासंघाला आतापर्यंत बुध्दीमान खासदारांची परंपरा आहे. यापूर्वी विशेषतः बॅरिस्टर नाथ पै, कोकण रेल्वेचे जनक आणि ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते, त्यानंतर अखंड शिवसेनेचे नेते तथा नदीजोड प्रकल्पाचे माजी प्रमुख सुरेश प्रभू यांनी रत्नागिरीचे नेतृत्व केले. नंतर १५ व्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव करत काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे हे विजयी झाले. त्यानंतर निलेश राणे यांना या मतदारसंघातून कधीच विजय मिळविता आला नाही.

माजी खासदार निलेश राणे यांनी आता राजकारणात मन रमत नाही असे सांगत सक्रिया राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे असे सांगत इतर कोणतेही कारण नाही असे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मात्र सिंधुदूर्ग-रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी निलेश राणे यांचे राजकिय मतभेद असल्यानेच निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्याचे बोलले जात आहे.

निलेश राणे यांनी राजकिय संन्यास घेतल्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी आपापल्या पदाचे राजीनामे निलेश राणे यांच्या समर्थकांनी दिले आहेत.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1716709978227290112

Check Also

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *