Breaking News

थलापथी विजयच्या ‘लिओ’ने देशात पाच दिवसांत केली २१६ कोटीची कमाई 'विक्रम'ला मागे टाकत 'लिओ' जगभरात केली ४३० कोटीची कमाई

प्रमुख अभिनेता असलेल्या थलापथी विजयचा ‘लिओ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सोमवार कामाचा दिवस असूनही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही. एवढेच नाही तर पाच दिवसांत हा लोकेश कनागराज सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

थलापतीच्या लिओने कमल हसनच्या ‘विक्रम’च्या आयुष्यभराच्या कमाईलाही मागे टाकले आहे. पाच दिवसांत हा चित्रपट देशातील २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असतानाच, जगभरात ४०० कोटींचा टप्पाही पार केला आहे. ‘कैथी’ हा लोकेश कनागराजचा LCU मधील पहिला चित्रपट होता. यानंतर यांचा दुसरा चित्रपट कमल हासनचा ‘विक्रम’ होता. हाच वारसा पुढे नेत थलापथी विजयचा ‘लिओ’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला.

आगाऊ बुकिंगमुळे, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६४.८० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले. sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘लिओ’ ने पहिल्या सोमवारी ३५.१९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी वीकेंडला या चित्रपटाने ४१.५५ कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे, रविवारच्या तुलनेत सोमवारी व्यवसायात -१५.३१ % टक्यांची घट झाली आहे. पाच दिवसांत ‘लिओ’ने देशात २१६.५९ कोटी रुपयांचे निव्वळ व्यवसाय केला आहे.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *