Breaking News

साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून १५ मार्चपर्यंत कोठडी किरीट सोमय्या यांचे अनिल परबांना बॅग भरून राहण्याचे आव्हान

कोकणातील साई रिसॉर्टप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री तथा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांनी परब यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. अखेर ईडीने शुक्रवारी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक करत आज त्यांना न्यायालयात हजर केले असता ईडी न्यायालयाने १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

आज सदानंद कदम यांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांनी १४ दिवसांची कोठडी मागितली. ज्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे न्यायालयात ईडीच्या वकिलांनीही अनिल परब यांचं नाव घेतलं.

अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या माध्यमातून विभास साठेंना ८० लाख रुपये दिले, असा दावा ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला. तसेच बंगल्यांना रिसॉर्टमध्ये बदलण्याचा निर्णय अनिल परब यांनी घेतला, असं ईडीने न्यायालयात दावा करण्यात आला. ईडीने या प्रकरणाच्या तपासासाठी सदानंद कदम यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण सदानंद कदम यांच्या वकिलांनी या कारवाईला चांगलाच विरोध केला. ईडीने केलेली कारवाई कशाप्रकारे चुकीची आहे, असा युक्तिवाद सदानंद कदम यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर दुसरीकडे ईडीकडूनही जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अखेर न्यायालयाने संदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

कदम यांच्या वकीलांनी आपला युक्तीवाद करताना म्हणाले की, सदानंद कदम यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे. तर ईडीच्या वकीलांनी युक्तीवाद करताना म्हणाले की, आम्हाला चौकशी करण्याची गरज आहे. दोघांचं म्हणणं ऐकून न्यायालयाने १५ मार्च पर्यंतची कोठडी दिली. तसेच त्यांना घरातून जेवण आणि मेडिकल सुविधा पुरविण्यास न्यायालयाने मान्यता दिली. त्यांची चौकशी केली जाईल तेव्हा ऍडव्होकेट त्यांच्यासोबत हजर राहू शकतो हे सुद्धा न्यायालयाने परवानगी देताना स्पष्ट केले. न्यायालयाची ऑर्डर आल्यावर तुम्हाला त्यांची उत्तर नक्कीच मिळतील असं सदानंद कदम यांचे वकील निरंजन मुंगधी यांनी सांगितले.

अनिल परब यांच्या सांगण्यावरुन सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्यासोबत ८० लाखांचा व्यवहार केला. जवळपास ५४ लाखात साई रिसॉर्टची बांधणी करण्यात आली. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे नेमके कुठून आले? याचा तपास आम्हाला करायचा असल्याचे ईडीने युक्तीवाद करताना न्यायालयास सांगितले.

दरम्यान, भाजपाचे किरीट सोमय्या यांनी या कारवाईनंतर म्हणाले, आता अनिल परब यांनी साई रिसॉर्ट प्रकरणी तुरुंगात जाण्यासाठी बॅग भरून तयार रहावे असा इशारा दिला.

Check Also

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *