Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा इशारा, असे अनेक गौप्यस्फोट होत राहतील त्यांच्या अनेक उत्तरातून ही माहिती बाहेर काढणार

गेल्या काही दिवसांपासून साधारणतः अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शपथविधीच्या घटनेवर सातत्याने नव्याने चर्चा होत आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सुरुवातीला यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठविली गेली. जर हा शपथविधी झाला नसता तर उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असते का? असा खुलासा केला. त्यानंतर पुढील राहिलेली माहिती शरद पवार यांनीच द्यावी अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यानंतर यासंदर्भात आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबतचे गौप्यस्फोट होत राहतील तसेच त्याबाबतची माहिती अशीच हळूहळू बाहेर काढणार असून ती त्यांच्याच तोंडून काढून घेणार असल्याचा इशाराही दिला.

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचे वक्तव्य केले.

२३ नोव्हेंबर २०१९ ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं, त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले आहे का, असा सवाल फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले, आम्ही एकमेकांचे शत्रु नाही. आम्ही एकमेकांचे वैचारीक विरोधक आहोत. त्यांनी एक विचारधारा स्विकारली मी एक स्विकारली असे. त्यामुळे आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत. माझं आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्याशी शत्रुत्व नाही. मात्र काही गोष्टीमुळे शत्रुत्व झाल्याचे वातावरण राज्याच्या राजकारणात आहे. मात्र अशा गोष्टी कमी करण्यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *