Breaking News

डोक्यावरून पाणी गेल्यावर मुख्यमंत्र्यांना लक्षात आले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा उपरोधिक टोला

शिर्डी: प्रतिनिधी
राज्यात संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवायला पाहिजे होती. मात्र त्यांची यात्रा सुरुच असून आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी एक दिवस बंद ठेवली. जर
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळीच सुचना द्यायला हव्या होत्या. मात्र डोक्यावरुन पाणी वाहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आल्याचा उपरोधिक टोला अजितदादा पवार यांनी लगावला.
शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते.
राज्यातील पुरपरिस्थितीला भाजप सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. बर्‍याच ठिकाणी महाराष्ट्रातील जनता पुरात अडकली आहे. सातारा, सांगली जिल्हयातील १ लाखापेक्षा लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाटकात भाजप, महाराष्ट्रात भाजप आहे. केंद्रातही सरकार भाजपाचे सरकार असतानाही योग्य तो निर्णय घेतला गेला नसल्याची आरोप त्यांनी केला.
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कोयनेपेक्षा चारपटीने मोठे आहे. त्यातून पाणी पुढे जात नाही. त्यातील पाण्याचा फुगवटा महाराष्ट्रातील सांगली, सातारा जिल्हयात मारला गेला आहे. कर्नाटक सरकारने धरणाचे पाणी सोडताना सुचना द्यायला हवे होती. परंतु त्यांनी काही केले नाही असा आरोपही त्यांनी केला.
सरकारने सर्वोतोपरीने मदत पुरात अडकलेल्या लोकांना करायला हवी. यामध्ये आम्हाला राजकारण करायचे नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने काम करायला हवे होते ते केले गेले नाही. पूरपरिस्थिती असलेल्या भागात आमचे नेते जनतेच्या सेवेसाठी काम करत आहेत. नैसर्गिक संकटं येतात. त्यातून शेतकऱ्यांना उभं करायचं असतं. त्यांच्या पाठीशी उभं रहायचं असतं पण सरकार तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.
यात्रेला गेले दोन दिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना यात्रेत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठयाप्रमाणात तरुण वर्ग डॉ. अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत. ते आमचे खासदार आहेतच परंतु ते सेलिब्रिटीही आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी गर्दी होत आहे. पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त नीट ठेवावा असेही ते म्हणाले.
आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना हा युतीचा अनुभव सर्वांना पाहायला मिळत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम या भाजप सरकारकडुन सुरु आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला राज्यात काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एक लादलेली यात्रा आणि दुसरी उत्स्फूर्त जनतेसाठी यात्रा हा फरक असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *