Breaking News

अजित पवार म्हणाले, सिहांसनाधिष्ठीत पुतळा आहे, काय अभिवादन करायचे ते करा भाजपा आमदार मुनगंटीवारांच्या प्रश्नावरून पवारांनी दिले उत्तर

तिथीनुसार साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित करत नेमकी शिवजयंती कोणत्या तारखेची असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एका पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या पक्षाने आयोजित तिथीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहीले. परंतु राज्य सरकारने निश्चित केलेली तारीख १९ फेब्रुवारीच आहे. शासकिय तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच त्या दिवशी सुट्टीही देण्यात आली. पण काही जण तिथीनुसारही शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे ३६५ दिवस महाराजांची जयंती साजरी केली तरी काही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सरकार येण्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. त्यावेळी अधिवेशन असताना कधीही तिथीनुसार जयंती साजरी झाली नाही. कधीही फोटो लावण्यात आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जन्मतारीख किंवा तिथीचा वाद घालण्यापेक्षा ते आपले सगळ्यांचे दैवत आहे, हे त्रिवार सत्य आहे. पाठिमागच्या काळात आघाडीचे सरकार असताना माजी मंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांनी इतिहासात महाराजांचा जन्म कधी झाला याचा शोध लावून १९ फेब्रुवारी १९३० ही तारीख निश्चित झाली. तेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवनेरी येथे शिवजयंती साजरी करत आहेत. आजतागायत सर्वच मुख्यमंत्र्यांनी ही प्रथा सुरु ठेवली. सरकारच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती साजरी केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख म्हणून तिथे जयंती साजरी करण्यासाठी गेले आहेत. शिवसेनेत स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून ते शिवजयंती साजरी करत आहेत. आम्ही तारखेप्रमाणे जयंती साजरी करत आलो आहोत. कोणत्याही नागरिकाला तिथीप्रमाणे किंवा तारखेप्रमाणे जयंती साजरी करायची असेल ते तसे करु शकतात असेही त्यांनी सांगितले.

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा याचसंदर्भातील मुद्दा उपस्थित केल्यानंतर संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, विधानभवनाच्या आवारात फोटो नाही तर चांगला सिंहासनाधिष्ठीत पुतळा आहे. ज्यांना अभिवादन करायचेय त्यांनी खुशाल तेथे जावून करावे असे उत्तर त्यांनी दिले.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.