Breaking News

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, शिवजयंती नेमकी कधीची खरी, तारखेची की तिथीची? मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीवरून केला मुद्दा उपस्थित

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे बोलण्यास उभे रहात म्हणाले, अध्यक्ष महोदय राज्यात ज्या दिवशीही महापुरूषांची जयंती असले, त्यादिवशी सभागृहात महापुरूषांच्या फोटोची फ्रेम सभागृहात लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेनुसार जयंती साजरी करण्यात आली. मात्र आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही जंयती साजरी होत आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहीले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची नेमकी जयंतीची तारीख कधीची आहे असा असा सवाल त्यांनी केला.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला.

शिव जयंतीबाबत राज्य सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केलेली आहे. त्या दिवशी शिवजयंती राज्य सरकारने साजरी केली. मात्र आज पुन्हा शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः हजरे राहीले. जर शासकिय तारखेनुसार शिवजयंती साजरी होत असताना इतर दिवशीही जयंती साजरी करण्यात येत असल्याने शिवजयंतीची नेमकी तारीख कोणती असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे मी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली की आज का शिवजयंती साजरी करण्यात येत आली नाही. त्यावर त्या अधिकाऱ्याने मला सांगितले की तारखेनुसार १९ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी झाली. त्यामुळे आज आम्ही साजरी करत नाही. मग मला प्रश्न पडतो की नेमकी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कधी? आज होत असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहील्याने नेमकी शिवजयंती आज आहे की १९ फेब्रुवारीला असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जर तारखेची खरी असेल तर ती तारखेलाच साजरी करा आणि तिथीप्रमाणे असेल तर तिथीप्रमाणे साजरी करा असे आवाहन करत शिवाजी महाराजांचा जन्मदिवस नेमका कधीचा हा एकदा जाहीर करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

त्यावर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या कार्यक्रमाला गेले. मात्र सरकारी तारखेनुसार शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजीच साजरी करण्यात येते. दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर त्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजनही होत असल्याची बाब अधोरेखित केली.

Check Also

नौदलाच्या नव्या झेंड्यावर छत्रपतींच्या राजमुद्रेची छटाः मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले… शिवाजी महाराजांना अभिवादन असल्याचे व्यक्त केले मत

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published.