Breaking News

राज्यांतर्गत येण्या-जाण्यासाठी हे आहेत नियम राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ३ मे नंतर लॉकडाऊनमध्ये टप्याटप्याने शिथिलता आणण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. मात्र रेड झोनमधून प्रवास करताना किंवा त्यासाठी परवानगी देताना या खालील अटी व शर्ती राहणार आहेत.
१) या तत्वानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये रहदारी सुरु करताना कंटामेंन्ट झोन, हॉटस्पॉट जर एखाद्या शहरात किंवा भागात जाहीर केला असेल त्या भागात आत आणि बाहेर जाण्यास मज्जाव राहणार आहे. त्याच्या बाहेरून प्रवासास मुभा राहील.
२)तसेच रेड झोनमधील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी शहरातून कोणत्याही रहदारी किंवा गोष्टींना परवानगी राहणार नाही. याभागातून वाहतूक करायची झाल्यास ती बाहेरील रस्त्याने सुरु करावी.
३) मालेगांव, सोलापूर, अकोला,अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद आणि नागपूर भागात कोणत्याही गोष्टींना परवानगी देण्याअगोदर काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घ्यावा.
४) ज्या व्यक्तीला प्रवास करायचा आहे त्या व्यक्तीला इन्फ्लुएझा सारखे लक्षणे नसतील आणि त्याला प्राधिकृत डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिले असेल तरच त्या व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
५) एखाद्या व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पाठविण्याची परवानगी दिली असेल तर सदरच्या नोडल अधिकाऱ्याने संबधित जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याला या संदर्भात माहिती देणे बंधनकारक आहे.
६) त्याचबरोबर पोलिसांकडून ई-पास मिळण्याची सुविधा यापुढेही कायम राहणार आहे.

रेडझोनमधील जिल्हे– मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळ‌े, अकोला, जळगांव
ऑरेंज झोनमधील जिल्हे– रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदूरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड.
ग्रीनझोनमधील जिल्हे– उस्मानाबाद, वाशिम, सिंधूदूर्ग, गोंदीया, गडचिरोली, वर्धा.

05-01-2020-12.15.44

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *