Breaking News

विधानभवन परीसरातून….भाईंना पाहून नानांनी केली मान वाकडी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधातील असंतोष कारणीभूत ?

मराठी ई-बातम्या टीम
विधानभवनाच्या मुख्य प्रवेशव्दारा शेजारी अंथरलेल्या ‘रेड कार्पोरेट’ वरून आमदार भाई जगताप आले. भाई येत असल्याचे पटोलेंच्या नजरेत आले आणि पटोले कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागले. नानांना पाहिलेल्या भाईंनी त्यांच्याकडे न पाहता थेट पायऱ्यांवर आले.
यावरुन कॉग्रेसमध्ये मतभेद असल्याचे यावेळी दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप समोरासमोर येऊनही नमस्कार सोडा; पण एकमेकांडे पाहिले नाही. भाईंना पाहून नानांनी मान वाकडी केली; तर भाईंनीही इकडे-तिकडे न पाहाता निघून गेले. त्यावरून प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे, नाना-भाईमधील मतभेदाच्या दरीचा अंदाज आला.
विधिमंडळाच्या आवारात बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता आलेले नाना हे दारातच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्याचवेळी म्हणजे, ११ वाजून २५ मिनिटांनी भाईही आवारात आले. तेव्हा विधान भवनाच्या पायऱ्याच्या अलीकडे नानांची मुलाखत सुरू होती. शेजारी अंथरलेल्या ‘रेड कार्पोरेट’ वरून भाई आले. भाई येत असल्याचे पटोलेंच्या नजरेत आले आणि पटोले कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागले. नानांना पाहिलेल्या भाईंनी न पाहता पायऱ्यांवर आले.
झिशान सिध्दीकी प्रकरणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे सर्वच कार्यकर्त्यांच्याकडून टीकेचे धनी ठरले आहेत. तसेच त्यांच्या तापट स्वभावामुळे हल्ली त्यांचे काँग्रेसमधील नेत्यांशीही आणि कार्यकर्त्यांशीही पटेनाशे झाले आहे.
त्यामुळे त्यांच्या विरोधातील असंतोष पक्षांतर्गत वाढीला लागला आहे.
त्यातच भाई जगताप यांची विधान परिषदेवरील मुदत नुकतीच संपली असून त्यांना पुन्हा मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या जागेसाठी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाई जगताप यांच्या विरोधात पक्षातंर्गत चांगलाच असंतोष निर्माण झाल्याचे दिल्याचे दिसून येत असून त्याच पार्श्वभूमीवर भाईंना पाहून नानांनी मान तर वाकडी केली नाही ना? अशी चर्चा काँग्रेसबरोबरच विधान भवन परिसरात सुरु झाली आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *