Breaking News

जयराम रमेश यांच्याकडून इमारतीला मोदी मल्टीप्लेक्सची उपमा तर भाजपा म्हणते… भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

पाचच दिवसांपूर्वी गणेश चर्तुर्थीचे औचित्य साधत नव्या संसद भवनाच्या इमारतीत प्रवेश करत संसदेचे विशेष अधिवेशनही घेण्यात आले. मात्र या संसद भवनाच्या नव्या इमारतीला मोदी मल्टीप्लेक्स किंवा मोदी मैरियट असे म्हणायला पाहिजे अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत केली.

जयराम रमेश म्हणाले, तसेच या संसदेच्या नव्या इमारतीच्या लॉबीमध्ये दोन व्यक्तींना संवादही साधता येत नाही. त्यामुळे संवादाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. वास्तुकलेच्या माध्यमातून राज्यघटना नव्याने न लिहिताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीला मारून टाकले असल्याची टीकाही केली.

त्याचबरोबर जयराम रमेश आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, तसेच सभागृह आटोपशीर नसल्याने एकमेकांना बघण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासते अशी खोचक टीप्पणी करत संसदेच्या जून्या इमारतीत बरीच वैशिष्टे होती, तसेच चर्चा करायला आणि संवाद साधण्यासाठी मोकळीक भरपूर होती. तसेच जून्या संसदेत सेंट्रल हॉल आणि दोन्ही सभागृहात येणे जाणे सहज शक्य होते. मात्र संसदेच्या नव्या इमारतीत एकदा रस्ता चुकला तर भुलभुलैयात हरविल्यासारखे होते असे मतही नव्या इमारतीबद्दल व्यक्त केले.

तसेच जयराम रमेश म्हणाले की, २०२४ नंतर होणाऱ्या सत्ता परिवर्तनानंतर संसदेच्या नव्या इमारतीचा सुयोग्य पध्दतीने वापर करण्यात येईल असेही म्हणाले.

त्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जयराम रमेश यांच्या ट्विटला ट्विटने प्रत्युत्तर देत म्हणाले, केवळ हे काँग्रेसचा दर्जा घसरला म्हणून हे वक्तव्य आले नाही तर त्यांची दयनीय मानसिक अवस्थाही दर्शविते. त्यांचे वक्तव्य हे देशातील १४० कोटी जनतेच्या भावनांचा अपमान आहे.

पुढे जे पी नड्डा हसत म्हणतात यापूर्वीही काँग्रेसने १९७५ साली अशीच संसदेच्या विरोधात भूमिका मांडली होती. पण त्यावेळी यशस्वी झाली नाही याचीही उपरोधिकपणे आठवण करून दिली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *