Breaking News

Chandrayaan 3: विक्रम आणि प्रग्ज्ञान रोव्हरकडून सिंग्नल देणे बंद इस्त्रोकडून ट्विट करत माहिती

भारताने मोठ्या प्रयत्नानंतर Chandrayaan 3 (चंद्रायान-३) मोहिम आखून यशस्वीरित्या चंद्रावर पाठविले. तसेच Chandrayaan 3 (चंद्रयान-३) मोहिमेत आतापर्यंत विक्रम आणि प्रग्ज्ञान रोव्हरकडून व्यवस्थित सिग्नल खाली पृथ्वीवर पाठविण्यात येत होते. मात्र आता विक्रम लॅडर आण प्रग्ज्ञान रोव्हरकडून सिग्नल येणे बंद झाल्याची माहिती इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी ट्विट करत दिली.

पुढे बोलताना एस सोमनाथ म्हणाले, आता सिग्नल मिळणे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आणखी किती दिवस लागतील याची कोणतीही माहिती सध्या माझ्याकडे नाही सांगूही शकत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील दिवसमानानुसार १४ दिवस आपण वाट पाहू शकतो असे सांगत सध्या कदाचित चंद्रावर सतत सुर्यप्रकाश आहे. त्यामुळे तेथील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची शक्यता असल्याचे मतही वर्तविले.

पुढे बोलताना एस सोमनाथ म्हणाले, सुर्यप्रकाश असल्याने तेथील विक्रम (लॅडर) प्रग्ज्ञान (रोव्हर) च्या अंतर्गत मशिन्समध्ये वाढ झाली असेल. त्यामुळे सिग्नल बंद झाले असू शकेल. मात्र १४ व्या दिवशी सुर्यप्रकाश येण्याचे थांबल्यानंतर तापमान पुर्वरत होण्याची शक्यता अधिक आहे. पण आता काहीही सांगणे किंवा भविष्य वर्तविणे कठिण असल्याचेही स्पष्ट केले.

तसेच सिस्टीम पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या संधी आणखी आहेत. तसेच त्याचे काही फायदेही आहेत. आम्ही त्यावर भरपूर प्रयोग केले आहेत. परंतु वेळेनुसार त्यात होऊ शकतो. जर सिस्टीम पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाली तर त्याला नव्या ठिकाणी ठेवून तेथील नवा डेटासेट मिळू शकेल. तसेच एकाच ठिकाणी सिस्टीम राहिली तर तेथील नेमकी माहिती आपल्याला मिळू शकेल आणि तेथील वस्तुस्थितीही कळू शकेल असेही एस सोमनाथ यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *