Breaking News

या चार मानाच्या श्री गणेशांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन चारही ठिकाणी सत्कार स्विकारत घेतले दर्शन

महाराष्ट्रात सध्या गणेशोस्तव धुमधडाक्यात सुरु आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे गृहमंत्री अमित शाह हे खास मुंबईच्या दौऱ्यावर आपल्या कुटुंबियांसह आले. मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर मुंबईतील वैशिष्टेपूर्ण असलेल्या मानाच्या चार गणरायांचे दर्शन सत्कार स्विकारत घेतले.
जाणून घेऊ या गृहमंत्री अमित शाह यांनी कोणकोणत्या गणरायाचे दर्शन घेतले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्निक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी शाह यांचे औक्षण केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.

००००

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्री सरिताताई फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, माजी मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.

 

—–000—–

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, माजी मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

00000
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सपत्नीक दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी”

मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “झिरो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *