Breaking News

अखेर मुख्यमंत्रीही निघाले अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर : असा राहणार कार्यक्रम मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारा १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय  विश्रामगृहाकडे प्रयाण

सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे),सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा.

सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहराकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा.अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,

दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,

दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,

दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,

दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *