Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र,… फॅमिली गॅदरींग झाल्यासारखी सभा होती

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यात पोहोचू शकले नसलेल्या राज्यातील जनतेची मते-भावना जाऊन घेण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा मणिपूर ते मुंबई असा काढण्यात आला. त्या यात्रेचा समारोप काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला.

यावेळी झालेल्या जाहिर सभेला इंडिया आघाडीतील सर्व राजकिय पक्ष उपस्थित राहिल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडत म्हणाले, कालची विरोधकांची सभा पाह्यली, ती सभा म्हणजे इंडिया आघाडीची फॅमिली गॅदरींग आयोजित करण्यात आल्यासारखी होती. ज्या शिवाजी पार्क मैदानावरून स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकला जायचा आज त्यांच्याच वारसदाराकडून काँग्रेसच्या सभेला उपस्थिती लावत आता पुन्हा कधीच तमाम हिंदू माता आणि भगिनींनो असा आवाज ऐकायला यायचा नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, माझ्यावर जर काँग्रेसबरोबर युती करण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन असे बोलतानाचा एक व्हिडिओ नुकताच पुन्हा एकदा ऐकण्यात आला. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी तसे स्पष्टपणे म्हटल्याचे दिसून येत आहे, तरीही त्यांचे सुपुत्र काँग्रेस वाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. इतकेच नव्हे तर इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका करताना म्हणाले, त्यांना भाषणासाठी अवघे पाच मिनिटांचा वेळ दिला अशा खोचक भावनाही व्यक्त केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आमच्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरु आहे. जो पर्यंत सन्मानजनक जागा मिळणार नाहीत. तोपर्यंत बोलणी सुरु राहिल. एकदा की सन्मानजनक जागा मिळाल्या की त्या आम्ही महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितरित्या जाहिर करू अशी माहितीही यावेळी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *