Breaking News

भुजबळांना रोखण्यासाठी सत्ताधारी आमदारांचा पुढाकार राष्ट्रवादीच्या आमदारांऐवजी काँग्रेसचे आमदार धावले मदतीला

नागपूर : प्रतिनिधी

तब्बल सव्वादोन वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत आगमन झाल्यानंतर आज ते पहिल्यांदा काय बोलणार याबाबत सबंध सभागृहात उत्सुकता होती. मात्र त्यांच्या वाग्बाणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे घायाळ झाल्याने त्यांनी भुजबळ यांच्यावर चिडून प्रत्तितुर देण्याचा प्रयत्न केला. तरीही  भुजबळ हे थांबले जात नसल्याचे पाहून सत्ताधारी बाकावरील भाजप शिवसेनेचे सदस्य भुजबळांच्या अनेक वाक्यावर हरकत घेत त्यांच्या भाषणात वत्यव्य आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.

भुजबळांच्या वक्तृत्वाने अनेकजण घायाळ होतात. याबाबत नेहमीच चर्चा सुरु होती. मात्र त्याचा अनुभव बऱ्याच दिवसानंतर भाजप-शिवसेनेला आला.

भुजबळ यांच्या भाषणात वत्यव्य आणण्याच्या उद्देशाने भाजपच्या आमदारांपाठोपाठ पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मध्येच ओरडून त्यांना भाषण थांबवा, चुकीचे आऱोप करू नका अशी सूचना त्यांना वारंवार करत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव वगळता इतर सदस्य शांत होते. तर काँग्रेसचे अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे यांच्यासह अन्य आमदार राज पुरोहीतला शांत बसण्यासाठी सांगत होते. अखेर अब्दुल सत्तार यांनी जोपर्यंत राज पुरोहीत शांत बसत नाही. तोपर्यंत आपणही उभे राहून त्याला सांगत राहणार असल्याचे मोठ्याने सांगितले.

तेवढ्यात संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट हे सभागृहात आले आणि त्यांनी राज पुरोहीत यांना शांत बसण्यास सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये निर्माण झालेला वाद थांबला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *