Breaking News

बाहुबली भुजबळांचा मुनगंटीवारांवर वार वाग्बाणांनी वनमंत्री घायाळ

नागपूर : प्रतिनिधी

नाशिक येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यात हजारो शेतकरी सहभागी झाले. त्यांचे पाय रक्ताळले. त्यांचे आंदोलन हक्काच्या जमिनीसाठी आंदोलन होते. आपल्याला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी होती. तुम्ही त्यांना आश्वासन देऊन घरी पाठवले पण त्यावर काहीच केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. तब्बल सव्वादोन वर्षानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत पाऊल ठेवले. त्यामुळे आज ते कोणावर कडाडणार याबाबत उत्सुकता होती. मात्र त्यांच्या आजच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चांगलेच घायाळ झाले.

या सरकारने लोकांची फसवणूक केली, यांनी चार वर्षात काय दिवे लावले ते मला माहीतेय. सरकराने राज्यची आथिक स्थिती बिघडवली असल्याचा आरोप केला. याशिवाय राज्यातील जनतेला यांनी अनेक आश्वासन दिले. राज्याला खड्डेमुक्त करणार टोलमुक्त करणार असे आश्वासन दिले त्याचे काय झाले ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील अनेक गावांमध्ये आज वीज नाही. गावगावात वीज पोहोचवू असे आश्वासन यांनी दिले होते. रिलायन्स एनर्जीचे २ हजार कोटीचे कर देणे बाकी आहे. त्याचे काय झाले. हे सरकार आदाणी अंबानी सारख्या उद्योगपतीसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुनगंटीवार आणि भुजबळ यांच्यात खडाजंगी

नाशिक जिल्ह्यात झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जमिनीचे पट्टे तयार करण्यास वेळ नसल्याचे सांगतात. तसेच प्रत्येक खाजगी जमिनीवरही जावून झाडे लावतात. या आरोपावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत अशी कामे काय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केली जातात काय ? असा सवाल करत जमिनीचे पट्टे तयार करण्याचे काम महसूल विभागाचे असल्याची बाब भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर भुजबळ यांनी तुम्हाला काय बोलायचे ते माझे झाल्यावर बोला पण आधी माझे बोलणे पूर्ण होवू द्या अशी विनंती केली. तरीही मुनगंटीवार यांनी मी काहीही ऐकून घेणार नसल्याचे सभागृहातच मोठ्याने जाहीर केले.

त्यावर भुजबळ यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात करत मागील वर्षभरात १ लाख ८० हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादार केल्या. यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी बिघडवून टाकल्याचा आरोप केला.  भुजबळ यांच्या या आरोपावर मुनगंटीवार यांनी चिडून आमचे सगळे कामकाज पारदर्शी आहे. तुमच्यासारखे लपण्यासारखे नसल्याचे सांगत भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुनगंटीवार यांनी काही असंसदीय शब्दाचा वापर केला. त्यावर भुजबळ म्हणाले की, तुम्हीही टीका करुन सत्तेवर आलात पण तुम्ही दिवे लावलेत? तुम्ही विद्धान आहात. शिकलले आहात. तुम्ही १  लाख कोटी रूपयांच्या मागण्या मांडल्या. आर्थिक स्थिती बिघडविल्याचा पुन्हा आरोप केला.

नाशिक म अखेर मुनगंटीवारांचा संताप पाहून सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्य त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्याजवल धावले आणि भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात रंगलेली खडाजंगी थांबली.

भुजबळांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टोला

२०१८ पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यातील सर्व रस्ते टोल मुक्त करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र त्यावर काहीही केले नसल्याचा आरोप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबल साहेब तुम्ही मुद्यावर बोला अशी विनंती केली.

भुजबळ आणि पाटील यांच्यातील या संभाषणावर पुन्हा वाद निर्माण होवू नये या उद्देशाने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करत भुजबळ साहेब तुम्हाला बाब भाषण करता येत नाही. तुम्ही मंत्री राहीलात. मात्र आजही तुम्हाला भाषण करता येत नसल्याची सूचना करत योग्य भाषण करण्याची भुजबळांना सूचना केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *