Breaking News

अतिवृष्टीमुळे कॉलेज, शाळा यांच्या प्रवेशाची तारीख वाढविणार मुख्यमंत्री फडणवीस यांची शिक्षण मंत्री तावडे यांना सूचना

नागपूर : प्रतिनिधी

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागील दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम उपनगराची लोकल रेल्वेसेवा बंद करण्याची पाळी आली आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. त्यामुळे काही अघटीक घटना घडू नये यादृष्टीकोनातून कॉलेज महाविद्यालयाचे प्रवेशाचे वेळापत्रक तपासून त्याची नव्याने तारीख जाहीर करावी आणि ज्या ठिकाणी शाळांना जिथे आवश्यकता असेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना केली.

विधानसभेत नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिवृष्टी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार, आशिष शेलार यांनीही या अनुषंगाने मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील सूचना केली.

मुंबईत जवळपास ३०० मिलिमीटरचा पाऊस झाल्याने पश्चिम उपनगरातील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय अनेक नागरीक अडकून पडलेले आहेत. या भागातील आदीवासींचा जीव धोक्यात आला असून या लोकांना बाहेर काढण्याची गरज आहे. तसेच नागरीकांना सुरक्षित ठिकाणी म्हणून शाळांमध्ये आपण स्थलांतरीत करतो. परंतु या शाळांमध्येच पाणी घुसले आहे. त्यामुळे सरकारने हवाई पहाणी करावी, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, नेव्ही यांची मदत घ्यावी असे आवाहन करत मुंबईकरांची यातून सुटका करण्यासाठी ठोस पावले उचलावित अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केले.

अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या त्या भागातील आमदार, मंत्री यांना मतदारसंघात पाठवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

चाकरमान्यांना नोकरीसाठी बाहेर पडावे लागते. पण प्रसारमाध्यमे सांगतात घराबाहेर पडू नका. आयएएस अधिकाऱ्यांना बसवा, महापालिकेत बसवा. मुंबईकरांचा अंत न पाहता त्यांना मदत करा. नैसर्गिक संकट असल्याने सरकारने तत्परतेने पाऊले उचलावीत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि कोकण भागात अतिवृष्टी होतेय. या संकटाचा सामना करण्यासाटी डिस्झाटर्स मँनेजमेंटकडून सर्व प्रकारावर लक्ष ठेवण्यात येत असून कोस्ट गार्ड, एनडीआरएफची नियुक्ती करण्यात आलीय. मुंबईतील ज्या भागात पाणी साचलेले आहे. त्या ठिकाणीचे रस्ते डायव्हर्ट केलेत. पश्चिम महानगराला जोडणारी रेल्वे सेवा बंद सून बाकी सगळ्या रेल्वे सुरु आहेत. तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी ५० अतिरिक्त पंप लावण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *