Breaking News

ईडी कार्यालयात जाण्याआधी संजय राऊत म्हणाले, शरण जाणार नाही… शिंदे गटाला टोला लगावत महाराष्ट्र कमकुवत होतोय पेढे वाटा

ईडीने दोन वेळा नोटीस बजाविल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे ईडीने आज रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी धाड टाकत तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेत ईडी कार्यालयाकडे नेले. त्यावेळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी संजय राऊत म्हणाले, कितीही कारवाई करा पण मी शरण जाणार नाही आणि गुवाहाटीलाही जाणार नसल्याचे सांगत शिवसेना सोडणार नाही असा निर्धारही व्यक्त केला.

लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न महाराष्ट्राला, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेला त्रास देण्यासाठी, महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी हे सर्व दमनचक्र आणि दहशत सुरू आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र व शिवसेना इतका कमकुवत नाही. खरी शिवसेना काय आहे हे तुम्ही पाहताय असेही ते म्हणाले.

लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न महाराष्ट्राला, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे. मात्र, महाराष्ट्र-शिवसेना कमकुवत होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे ‘संजय राऊत झुकेंगा नही’ आणि शिवसेना पक्षही सोडणार नसल्याचेही ते म्हणाले.

यानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाकडे निघाले. मात्र, तेवढ्यात पत्रकारांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी कारवाईवर आनंद व्यक्त केल्याचं सांगत त्यावर प्रश्न विचारला. यावर अचानक मागे वळत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणाले, पेढा वाटा, महाराष्ट्र कमकुवत होतोय, पेढे वाटा. महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा. आनंद व्यक्त करणारे बंडखोर आमदार बेशरम लोक आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *