Breaking News

काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा इशारा,.. अन्यथा स्मृती इराणींना रस्त्यावर फिरू देणार नाही केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या डहाणुतील घरावर महिला काँग्रेसची धडक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी हुज्जत घालत गैरवर्तन करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मर्यादा ओलांडली आहे. देशासाठी दोन महान व्यक्तींचे बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबातील सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचाही त्याग करून राजकारणात एक आदर्श घालून दिलेला आहे. विरोधी पक्षातील लोकांशीही त्या आदराने वागतात. अशा आदरणीय सोनियांजी यांच्याशी गैरवर्तन करून स्मृती इराणी यांनी त्यांची ‘संस्कृती’ दाखवून दिली आहे. इराणी यांनी सोनियाजी यांची माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, इशारा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिला आहे.

महिला काँग्रेसने प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या डहाणू येथील निवासस्थानावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

संध्याताई सव्वालाखे पुढे म्हणाल्या की, स्मृती इराणी यांची १८ वर्षांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवते. त्याविरोधात काँग्रेसने जाब विचारल्याने स्मृती इराणी यांना झोंबले, त्याचा राग धरून त्यांनी सोनियाजींशी संसद परिसरात हुज्जत घातली. सोनियाजी या ७५ वर्षांच्या राजकीय श्रेत्रातील आदरणीय नेत्या आहेत. लोकशाहीत सरकारला जाब विचारण्याचा विरोधकांना संविधानाने हक्क दिला आहे. पण सरकारला कोंडीत पकडत असल्याने व स्मृती इराणींच्या मुलीचे अवैध कारनामे बाहेर काढल्याने स्मृती इराणी यांनी असभ्य वर्तन केले. आमच्या नेत्यांचा अपमान कराल तर सहन केले जाणार नाही, त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही दिला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *