Breaking News

उध्दव ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, दमनशाही, दडपशाही सुरुय… पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसमोर मातोश्रीवर केले संबोधन

पण हे सगळं कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेले आहे. एक दमनशाही, दडपशाही सुरु आहे. हिंदुत्व त्याला हिंदुत्व हा शब्द बोलायचं तेव्हा कुणाचं धाडस होत नव्हत तेव्हा शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते? आज जे बसलेत त्यांची नामोनिशाणी तरी होती का? काय केल त्यांनी? अशी प्रश्नांची सरबती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर केली.

ठाणे येथील कार्यकर्त्ये आज ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आले होते. त्यावेळी खासदार राजन विचारे यांच्यासह आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले होते. त्यावेळी उध्दव ठाकरे हे बोलत होते.

आज सुध्दा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखठोक मध्ये लिहिलेले आहे. त्याच्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नातं तुटलं, तुटू शकत नाही. त्यांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी ते तुटू शकत नाही. तुटणारच नाही पण त्यांचा प्रयत्नच तसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं की ती जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची असा आरोपही त्यांनी केला.

आपल्या घरामध्ये तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे. हे मातोश्रीस तुमच असलेल नातं, काही जणांना मातोश्रीने जरा जास्तच प्रेम दिलं होत आणि त्या प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलिकडे गेले. बर गेले ते गेले मातोश्रीहून दिल्लीला पळतात. काल सुध्दा कसे पळालेत ते पहायला मिळाले, अडीच वर्षात अस कधीही झाल नव्हतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखाने शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न केला. कोणतही दडपण माझ्यावरती नव्हतं, कुणीही बेल वाजवल्यानंतर जर जेवत असलो तर जेवण अर्धवट टाकून पळत या की, पळत जाणारा मी मुख्यमंत्री नव्हतो. आता मात्र पुन्हा एकदा काही काळापुरती का होईना हीच परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढावली आहे. ज्यांना आपण मोठं केले ते शेफारली आणि तिकडे गेली अशी टीकाही त्यांनी बंडखोरांचे नाव न घेता केली.

हे सगळं घडलं त्यादिवशी पहिल्या प्रथम मी अनिता ताईंना फोन केला, तुम्ही बघितलं आता त्यांची ओळख करून देण्याची गरज नाहीए, शिवसेनेची वाघिण. म्हटलं वाघिण कुठे बघू? आणि त्यांनी एका क्षणात साहेब मी तुमची आहे, मातोश्रीची आहे, मला काही तुम्ही जबाबदारी द्या हाक मारा मी शिवसैनिक आहे, शिवसेने पासून मी दूर होऊ शकत नाही. म्हणजे आज जे लोभापायी, दमदाटीपायी तिकडे जाताहेत, आता काल सुध्दा आपल्यातला एक तिकडे गेला त्याची प्रतिक्रिया पाहिली. कशासाठी लोक चाललीय? असा सूचक सवालही बंडखोरांच्या जाण्यावर केला.

काल मी एक पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती? राज्यपालांच्या विरोधात नाही, कोश्यारीच्या विरूद्ध! त्यांना राज्यपालपदी बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज्यपाल म्हणजे हे पद फार मोठं आहे. त्या पदाचा मान जसा आपण राखतो तसा त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने तो राखण्याची गरज आहे. पण कालपासून जी एक सुरुवात झालेली आहे त्याचाच आजचा हा दुसरा टप्पा तो म्हणजे आता आपण इकडे एकमेकांशी बोलतांना संजय राऊतांच्या घरी ईडीचे पाहुणे बसले आहेत. हे काय चाललेलं आहे? हे काय कारस्थान आहे? हे कारस्थान एवढं भयानक आहे काल ते कोश्यारी बोलले महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केला, महाराष्ट्राचे मीठ खाऊन नमक हरामी केली त्याचाच हा पुढचा टप्पा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपाचे जे कारस्थान आहे, हिंदूंमध्ये फुट पाडायची मराठी अमराठी करायच मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि शिवसेना का संपवायची तर हिंदूंना आणि मराठी माणसांना ताकद देणारी ही संघटना ही एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला, मोकळ कुरण मोकळ पडलय चरत बसा. कुरण म्हणजे गवत असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

पण तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, तुमच्या सारखे जिवाला जीव देणारे शिवसैनिक आणि त्यांच्या जोरावर त्यांनी सांगितले अमरनाथ यात्रे मध्ये जर का वेडे वाकड घडल तर मी इकडून तुमची हजला जाणारी विमान उडू देणार नाही. तेव्हा जी परिस्थिती होती तेव्हा हे कुठे रांगत होते माहिती नाही. आता यांना मात्र हिंदुत्वाचा एक पुळका आलेला आहे. जो जो महाराष्ट्राच्या मुळावरती येईल तो कोणीही असला तरी त्याचा आदर तर शक्यच नाही त्याला महाराष्ट्र म्हणून काय आहे ते दाखवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देत ते पुढे म्हणाले जे त्यांच्या खेळीने आज दास झाले आहेत त्या दासांची प्रतिक्रिया काय होती? आम्ही पत्र लिहू आम्ही नाराजी व्यक्त करु. अरे हट कोणत्या राज्याचे तुम्ही कोण आहे अश्या राज्याच्या अपमान झाल्यानंतर सुध्दा गुळगुळीत जर प्रतिक्रिया देणार असाल तर ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण नव्हती आणि धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण नव्हती. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल पण तुमचे जोडे आम्ही पुसणारच ही शिवसेनाप्रमुखांची आणि धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण नक्कीच नव्हती. ही शिकवण जर तुम्हाला त्यांची वाटत असेल तर दुर्दैव तुमच आहे माझ्या शिवसैनिकांच नाहीए अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली.

शिवसैनिक आजही ताठ पाठकण्याणे उभा आहे आणि मरे पर्यंत राहणार. आणि म्हणून मला वाटतय मी वारंवार सांगतोय की एका नव्या पर्वाला सुरुवात होतेय, जर या देशामध्ये लोकशाहीचा खून होणार असेल हत्या होणार असेल, जे सरन्यायाधीश बोलले विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका, आता विरोधी पक्ष तर लांबच आहे पण एकाकाळी मित्र पक्षच होता त्याचा सुध्दा गळा घोटण्याचे काम सुरु आहे. संजय राऊतांच्या घरी जी ईडीची चौकशी सुरु आहे ते तेच सुरु आहे. हिंदूंचा मराठी माणसाचा शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय त्याचाच गळा घोटायचा. हे सगळ जे कारस्थान आहे ते उलथवून टाकायची आज गरज आहे. म्हणून तुम्ही आज जे आलाय घोषणा देताय या परिस्थितीत मुकाबला करण्याची धग तुमच्यात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. त्यावर शिवसैनिकांनीही जोरदार होय असे उत्तर दिले.

तुम्हाला आमदार केल मंत्री केल सगळ एवढी वर्ष तुम्हाला गुपित का फोडावस वाटले नाही. हे भंपक धंदे सोडून द्या याला काही अर्थ नाही. काल अर्जुन खोतकरने ते दडपण मान्य तरी केल. घाबरणारे शिवसैनिक असूच शकत नाही. दडपणाला घाबरणारा बाळासाहेबांचा आणि ठाण्याचा आनंद दिघेंचा शिवसैनिक असूच शकत नाही. जे आनंद दिघे दोन सव्वा दोन वर्ष तुरूंगात होते घाबरले? नाही नाही मला तुरूंगात नका नेऊ हो मला सोडून द्या. टाका किती दिवस टाकाल म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हणतात. मेलो तरी बेहतर पण धर्म नाही सोडणार, मेलो तरी बेहतर पण पक्ष नाही सोडणार पक्षाशी निष्ठा कशी असते त्या धर्मवीरांचे नाव आज जे घेताहेत त्यांच्या तोंडी शोभत नाही. म्हणून मी तुमचे खास धन्यवाद देतोय की अजूनही मराठी माती मध्ये वीर जन्माला घालण्याची परंपरा कुणी संपवू शकलेल नाही. ही या महाराष्ट्राच्या मातीची महंती आहे आणि अजूनही महाराष्ट्राच्या मातीच शौर्य आहे असे कितीतरी आले. त्या मातीला स्मरून एकच सांगेल की शेवटच्या क्षणा पर्यंत या जुलूमशाही विरोधात लढत राहू महाराष्ट्राची माती काय असते त्यांचा पराक्रम काय असतो गरज पडली असेल तर आपल्या वरती अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *